दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा हैदोस; शेती बागायतीचे अतोनात नुकसान
दोडामार्ग :
तालुक्यातील शेतकरी हत्तींच्या उपद्रवामुळे हैराण झाले असून दिवसेंदिवस नुकसानी सत्र वाढतच चालले आहे. काल पाळये येथील गणेश शिरसाठ यांच्या फळ बागायतीचे प्रचंड नुकसान केलें आहे. त्यांनी लागवड केलेलें जुनाट २० फुटी नारळाच्या विशाल झाड जमीनदोस्त करत नुकसानी केली आहे.
गेल्या दहा वर्षात त्यांचा बागायातीतील शंभरच्या वर नारळाच्या झाडाचे नुकसान केलें आहे. याकडे वन विभागाने लक्ष देउन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. तालुक्यात हत्ती प्रश्न गाजत असून पाळये येथे हत्तींनी उपद्रव माजविला आहे. यापूर्वी शेतकरी प्रथमेश वरक यांच्या सुपारी व केळी उध्वस्त केल्या होत्या. त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले होते
तिलारी परिसरातून शेतकरी हतबल झाले असून हेवाळे , केर, मोर्ले परिसरात वास्तव्यास असलेल्या हत्तींनी त्यांचा मोर्चा पाळये गावाकडे वळविला आहे. यापूर्वी तीन हत्तींचा कळप प्रथमेश वरक यांच्या फळ बागायतीत घुसला. सुपारीची झाडे मोडून केळी उध्वस्त केल्या होत्या. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. वनविभागाने या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी गणेश शिरसाठ यांनी करुन वन विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.