विधान परिषदेचे उपसभापती एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ आढळल्यानंतर कर्नाटक राज्याला मोठा धक्का बसलाय. धर्मेगौडा यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याचं प्राथमिकदृष्टया दिसतंय. धर्मेगौडा यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाईड नोटही आढळली आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी कर्नाटक विधान परिषदेत विरोधकांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे धर्मेगौडा चर्चेत आले होते.
धर्मेगौडा यांचा मृतदेह चिकमंगळुरूमध्ये कादूरनजिक एका रेल्वे ट्रॅकजवळ आढळलं. मध्यरात्री जवळपास २.०० वाजल्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केलीय.
‘राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएस नेते एस एल धर्मेगौडा यांच्या आत्महत्येच बातमी धक्कादायक आहे. ते खूपच शांत आणि सभ्य नेता होते. यामुळे राज्याला मोठं नुकसानं झालंय’ अशी प्रतिक्रिया जेडीएस नेते एच डी देवेगौडा यांनी व्यक्त केलीय.