*नारायण राणेंना मते देण्यासाठी मतदारांना पैसे वाटतानाचा कार्यकर्त्यांचा व्हिडिओ वायरल*
*आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली तक्रार*
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची निवडणूक ७ मे २०२४ रोजी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात मतदारांना पैसे वाटप झाल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले. लोकांमध्ये तशी चर्चा होत होती. मात्र आता कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील भाजप कार्यकर्ता श्री. विश्वनाथ जाधव व इतर कार्यकर्ते खुलेआम पैसे वाटतानाच व्हिडीओच वायरल झाला आहे. सदरचे पैसे नारायण राणे साहेबांनीच दिले आहेत. कमळ निशाणी समोरील बटन दाबून त्यांना विजयी करा असे व्हिडिओ मध्ये मतदारांना प्रलोभन दिले जात आहे. यासंदर्भात आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी (रत्नागिरी सिंधुदुर्ग, लोकसभा मतदार संघ) यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. तसेच यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.