You are currently viewing आई

आई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

“आई

————————————————-

आई ,वात्सल्यमूर्ती ही

असते प्रत्येकाच्या मनात…

 

जखमा होता शरीराला

वेदना होतात मनाला

आई ग ! हुंकार येतो ओठी

साद घाली मन आईला..

 

आई घडविते बालकाला

शिकवी पाऊल टाकण्या

घास चिऊ-काऊचे भरवी

तिच्या बाळाचे पोट भरण्या…

 

प्रिय सर्वांचे हो दैवत आई

कौसल्या माई,यशोदा आई

राम-कृष्ण यांनाही प्रिय आई

गृहस्वामिनी असते आई …

 

होवो लेकरं कितीही मोठी

आईसाठी तर ती सदा छोटी

हर प्रहरी लेकरांची चिंता

पांघरे शाल मायेची मोठी ..

 

आई ,वात्सल्यमूर्ती ही

असते प्रत्येकाच्या मनात…

——————————————–

कविता-आई

-अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342

———————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा