*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धन्य तू माते!धन्य तू आई !*
एकाच शव येत
दुस-याच तू सामान बांधते
एक येतो पेटीत
दुस-याची तू पेटी भरते ..!!
धन्य तू आई!
धन्य तू माते!
एक आला तिरंग्यात गुंडाळून
त्याला तू कुशीत झोपवलं
दुसरा निघाला सीमेवर
त्याच औक्षण केलं …!!
पोरांनी तुझ्या दुधाची
किंमत चुकती केली …!!!
आई गं!भारतमातेला
मुक्याने तू खूप सांगून गेली
दोघांना निरोप देऊन
जयहिंदचा नारा देत….रडली
तिरंग्याला कवटाळून
भारतमाता रडली ..!!
आई!भारतमातेची पोर तू!
विरांगना मातीची नाळ तू!
आई!मोठ्या आईला सांगितलस!
एवढ्यावरच भागवून घे
अजून पोर असती
तीही तुला दिली असती!
आख्खी कोख तुझ्याकरता
मोकळी केली असती ..!
धन्य तू माते!धन्य तू आई ….
धन्य भारतमाता!धन्य तुझी पुण्याई!
बाबा ठाकूर