*नक्षत्रवेल साहित्य समूहाचे सदस्य लेखक कवी मकरंद दीक्षित लिखित अप्रतिम काव्यरचना*
मातृ दिनानिमित्त समस्त मातांच्या चरणी दंडवत
*आई*
आई प्रेम आहे, ममता आहे, माया आहे ।
आई वात्सल्याची घनदाट छाया आहे ।।१।।
आई सूर आहे, ताल आहे, संगीत आहे ।
आई आयुष्याचे सुरेल अंगाई गीत आहे ।।२।।
आई तहान आहे, भूक आहे, भाकरी आहे ।
आई मोबदल्या शिवायची अमूल्य चाकरी आहे।।३।।
आई यातना, काबाडकष्ट, आणि घाम आहे ।
आई काशी, मथुरा, पवित्र चारी धाम आहे ।।४।।
आई ज्ञान आहे, गुरू आहे, अनमोल ग्रंथ आहे ।
आई तुकाई, मुक्ताई, ज्ञानाई अशी महान संत आहे।।५।।
आई त्याग आहे, सेवा आहे, आणि साधना आहे।
आई शक्ती, भक्ती आणि आराधना आहे ।।६।।
आई मंत्र आहे, पूजा आहे, तीर्थ आहे ।
आई ताकद, सामर्थ्य आणि परमार्थ आहे ।।७।।
आई दीप आहे, समई आहे, देवघरातील प्रकाश आहे।
आई विशाल धरती आणि निरभ्र आकाश आहे ।।८।।
आई जननी, जन्मदात्री, पालनकर्ती माता आहे ।
आई सरस्वती, पार्वती, लक्ष्मी आणि सीता आहे।।९।।
आई भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे ।
आई तुझ्या चरणी सदैव माझा माथा आहे ।।१०।।
रचना © : मकरंद दीक्षित, कात्रज, पुणे
9049811976।