You are currently viewing पिंपरी न्यायालयात न्यायाधीशांचा निरोप समारंभ संपन्न

पिंपरी न्यायालयात न्यायाधीशांचा निरोप समारंभ संपन्न

*पिंपरी न्यायालयात न्यायाधीशांचा निरोप समारंभ संपन्न*

पिंपरी

पिंपरी नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश आर. एस. वानखेडे, आर. एम. गिरी, पी. सी. फटाले, एस. पी. कुलकर्णी यांची विविध ठिकाणी बदली झाली असल्यामुळे पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने शुक्रवार, दिनांक १० मे २०२४ रोजी वकील बार रूम येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश एन. आर. गजभिये, बी. डी. चौखंट, एम. जी. मोरे, ए. एम. बगे, एम. ए. आवळे, व्ही. एन. गायकवाड तसेच आजी माजी अध्यक्ष आणि वकील बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि कार्यकारणीद्वारे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. विविध वकील बांधवांनी आपल्या मनोगतांमधून न्यायाधीश साहेबांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने अल्पोपाहाराचे आयोजन करण्यात आले होते. वकील बांधवांनी त्याचा आस्वाद घेत जुन्या हास्यविनोदासह आठवणींना उजाळा दिला. डिजीनोटीस एप्लीकेशनचे ॲप डेमो व प्रेझेंटेशन यशपाल बावीसकर आणि टीमने केले. त्यांनाही वकील बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, खजिनदार ॲड. अजित खराडे, ॲाडिटर ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड.आयाज शेख, ॲड. फारूख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. स्वाती गायकवाड, ॲड. मीनल दर्शले यांनी केले. सचिव ॲड. धनंजय कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. सदस्य ॲड. आयाज शेख यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा