*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मंजुळ गोपुरे*
*************
ही सांजसुरम्य कातरवेळा
आत्म्यालाच अंतर्मुख करते….
पाझरता अलवार पापण्या
साऱ्या , स्मृतींना भरते येते….
किणकिणारी मंजुळ गोपुरे
राऊळगाभारी , लक्ष वेधीते….
दयाघनाचीच ती मूर्ती सुंदर
आजही आत्म्याला सुखावते….
झरता लोचनी क्षणक्षण सारे
बाल्य निष्पाप मनी ओघळते….
जगुनी जाहले सारे सारे आता
जे जे हरविले , ते ते आठविते….
ललाटी भाग्य भाळीचे प्रारब्धी
भोगुनी तृप्ते , व्हावे आता रिते….
**************************
*रचना क्र. ८१ / ८ / ५ / २०२१*
*#©️वि. ग. सातपुते .( भावकवी)*
*📞 ( 9766544908 )*