You are currently viewing स्मृति भाग ६६

स्मृति भाग ६६

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ६६*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

*गौतम स्मृति* मधील सुरवातच मनात भरणारी आहे . पहा तर—

*वेदो धर्ममूलं तद्विदाञ्च स्मृतिशीले , दृष्टो धर्मव्यतिक्रमः साहसञ्च महतां , न तु दृष्टोsर्थो वरदौर्बल्यात् , तुल्यबलविरोधे विकल्पः ॥१॥*

म्हणजे वेद आणि त्यास जाणणार्‍यांचे स्मृत्यनुकूल आचरण आणि शीलच धर्माचे मूळ आहे . महान लोकांमधेसुद्धा ( कधी कधी ) धर्माचे अतिक्रमण व अत्याचार पाहिले गेले आहे . उत्तम जनांच्या दुर्बलतेमुळे लोक जीवन ध्येयाप्रती दुर्लक्ष करत असतात . दोन समान बलाच्या विचारकर्त्यांचे परस्पर विरोध असला तरी त्यातील एकास मानणे भाग पडते .

किती मुद्देसूद ! गद्य लिखाण असले तरी अक्षरात बदल करण्याची कुणाची शक्ति नाही !! धर्माचे मूळ एका वाक्यात सांगत मोठ्या लोकांकडून ( म्हणजे समाज ज्यांना मोठे म्हणून मान्यता देतो असे वयवृद्ध—ज्ञानवृद्ध—तपोवृद्ध—पदवृद्ध—धनवृद्ध) अतिक्रमण व अत्याचार यांचेकडेही ऋषि दुर्लक्ष करत नाहीत !! हे सर्वसामान्यांचे नजरेस पडते . आणि हा ऋषिंचा मोठेपणा ज्यांचे नजरेस पडत नसेल तो सगळा समाज किती मृतप्राय असेल ? व त्याचे उत्थानासाठी केवढ्या कष्टांची गरज असेल ? हा विचार ज्यांचे मनात येत नसेल त्यांचे मोठेपण हे खोटे नव्हे काय ?? पुढे ते सांगत आहेतच !! की उत्तम जनांचे दुर्बलतेमुळे लोक जीवनाचे ध्येयाकडे दुर्लक्ष करतात !! खरंच *कम्युनिस्ट विचारधारा व धर्मनिरपेक्ष विचारधारा* या धर्ममूळासच उखडून टाकणार्‍या असल्यामुळे अशा विचारधारांच्या लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करुन त्यांच्या हालचालींचे विरोधात समाज उभा करण्याचे खूप मोठे काम आत्ताच्या विचारवंतांचे आहे , हे विसरुन चालणार नाही . अशा धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या लोकांच्या वर्तन व वाचा अतिक्रमणासाठी ते सरकारद्वारा दंडित व्हावेत , असाही विचार करणारा वर्ग आज निर्माण होतोय , याचा बर्‍याच जणांना आनंद होत असावा . पुन्हा ते सांगतात , दोन समान बलशालि व्यक्तिंमधे विचारांचा परस्पर विरोध झाल्यावर एकाचे ऐकणे भाग पडते , हे केवढे सुबक विवेचन ! या गोष्टी समाजात रोजच घडत असतात . अशावेळी योग्य विचार कोणता ? हेच सांगणारा बलशाली नसेल तर सर्व समाज अयोग्य दिशेलाच जाईल ना ? म्हणून लक्ष्मी , शक्तिदेवता , अधिकार वा पदे , न्यायदेवता हे सर्व धर्मानुकूल व स्मृत्यानुकूल विचाराचे अधीन असावे , तरच राज्यशकट उत्तम विश्वबंधुत्वाचे दिशेने जाईल . अन्यथा आज आपल्या शेजारील राष्ट्रांचे सारखी परिस्थिती व मानसिकता होईल व ती राष्ट्रास अत्यंत घातक असेल ! आज थांबतो . उद्या काही विचारधन पाहूच .

तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा