चैत्र पालवी काव्य महोत्सव २०२४ पुणे, ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड आयोजित कवी संमेलनाच्या निमीत्ताने दि ५/५/२४ रोजी पुणे येथे जाण्याचा योग आला. खरतर हो नाही करता करता शेवटच्या क्षणाला जाण्याचा निर्णय घेऊन मी पुण्यात आलो. एक अविस्मरणीय क्षण माझ्या प्रतिक्षेत माझी वाट पहात होता म्हणून माझं नशीब मला स्वतःहात धरून पुण्यात घेऊन आले. अस म्हणायला हरकत नाही. कार्यक्रम दोन वाजता सुरू होणार होता. कवि रसीक प्रमुख पाहुणे प्रेक्षकांनी हॉल भरून गेला होता. पण कविसंमेलनाचे अध्यक्ष यांची वाट बघण्यात बराच वेळ जात होता. मग काही वेळा नंतर कविसंमेलनाचे अध्यक्ष डॉ शैलेंद्र भणगे यांना इलेक्शन डियूटी लागल्यामुळे त्यांना कार्यक्रमाला येण अशक्य होते, असा कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत जोगदंड यांना फोन वर कळवले आणि सर्वांची एकच तारांबळ उडाली अशा वेळी कुणाला काहीच सुचत नाही पण समंजसपणा आणि समयसुचकतेच भान ठेवून ज्याला निर्णय घेता आला तो आणि त्याचा कार्यक्रम कधीच फेल जात नाही. त्या वेळी असेच झाले चंद्रकांत जोगदंड सरांनी माईक हातात घेतला कार्यक्रम पत्रीके प्रमाणे सर्वांना मंचावर बोलवण्यात आले. त्या प्रेक्षकांच्या गर्दीत मी सुध्दा बसलो होतो. नाव घेतल्या प्रमाणे एक एक मान्यवर मंचावर आसनस्थ झालेत. आणि त्यानंतर या कार्यक्रमाच्या कवि संमेलनाचे अध्यक्ष संजय धनगव्हाळ असे जाहीर करतात मला सुखद धक्काच बसला. मी काय ऐकतोय माझं मलाच कळत नव्हते. मी स्तब्ध झालो. मला आश्चर्याचा धक्काच बसला. एका क्षणात जोगदंड सरांनी मला कवी संमेलनाचे अध्यक्ष पद देऊन श्रीमंत करून टाकले. मी अध्यक्ष होईल असा विचारही कधी केला नव्हता. मी पुण्याला येणार नव्हतो पण अकस्मातपणे मला मिळणारे अध्यक्ष पदच मला पुण्यात घेऊन आले माझ्या नशिबात होते आणि ते मला मिळाले हा आनंद मला अस्वस्थ करत होता मी मनोमनी सुखावलो आणि प्रचंड आनंदाने भारावलो. मी पहिल्यांदाच एका कवि संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारताना मला गहिवरून आले अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून खूप भारावून गेलो. भरगच्च प्रेक्षकांनी भरलेला हॉल आणि त्यांच्या समोर अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेलो खूपच विस्मयकारक वाटत होते. अनेक कविना माझ्या हातून सन्मान दिला जात होता. सन्मानपत्र घेताना स्वत:हून फोटो काढून घेत होते. म्हणजे प्रेक्षकांनी खचाखच भरलेला हॉल आणि मी कवी संमेलनाचा अध्यक्ष हे माझ्यासाठी सारं काही नवख आणि विचारा पलीकडचे होते. सार काही अनभिज्ञ वाटत होतं मनीध्यानी नसताना एका रात्री मुख्यमंत्री होण्याचा आनंद काय असतो. ते मी कविसंमेलनाचे अध्यक्षपद स्विकारताना अनुभवलं. मी तर कविता वाचायला आलो होतो आणि अध्यक्षस्थानी बसलो. मी माझ्य गाऱ्हाण मांडायला आलो आणि मलाच राजा केलं असच म्हणायचंय. खरच नशीबात काय वाढून ठेवले असते कुणाला काहीच माहीत नसते. जे नशीबात असतं ते कुठेही मिळते. माझ नशीब मला अध्यक्ष पद स्विकारण्यासाठी मला हात धरून पुण्यात घेऊन आले यात काही दुमत नाही. कार्यक्रमाच्या अखेरीस ज्या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार होता ते मान्यवर साहित्यक्षेत्रातील महामही आदरणीय श्रीपाल सबनीस सर आदरणीय बबन पोतदार सर व्यासपीठाच्या खाली खुर्चीवर बसलेले होते आणि मी त्याच्या समोर व्यासपीठावर. शिवाय चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे वर्गशिक्षक आदरणीय हनुमंत धालगडे सरांच्या हातून माझा गौरव करण्यात आला. आणि सरतेशेवटी छोटेखानी भाषणात मी माझा आनंद व्यक्त केला. आनंदाहुनही आनंद म्हणजे माझ्या काळजातली माणसं आदरणीय नानाभाऊ माळी, आदरणीय बाळासाहेब गिरी मला या कार्यक्रमात भेटलीत आणि माझ्या हातून त्यांनी सन्मान स्विकारताना मी धन्य पावलो. खरचं आदरणीय चंद्रकांत जोगदंड सरांचे आभार कसे व्यक्त करायचे काही कळत नाही. एव्हढा मोठा सन्मान चंद्रकांत जोगदंड सरांनी देऊन ते चैत्र पालवी काव्य महोत्सवाचे ते खऱ्यार्थाने हिरो ठरलेत सर्वांच्याच नजरेत त्यांनी त्यांच्या मोठेपणा दाखवून चैत्री पालवी काव्य महोत्सव यशस्वी केला व सर्वं मान्यवर व कविंना सुरूची भोजनाने तृप्त करुन कार्यक्रमाचा समारोप केला.
*संजय धनगव्हाळ*
*अर्थात कुसुमाई*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७