You are currently viewing वैशाखी पहाट

वैशाखी पहाट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वैशाखी पहाट*

—————————

 

रातराणीचा अजून दर्वळ, तोवर सखया येऊन जा

पहाट होण्या उशीर आहे, गंधा मध्ये न्हाऊन जा

केव्हा पासून मोजत आहे

आकाशीच्या चंद्र चांदण्या

वेली वरचा गंध शोधतो

निरोप माझा तुला सांगण्या

मत्त मोगरा फुलला आहे, सुगंधासवे वाहून जा

पहाट होण्या उशीर आहे, गंधा मध्ये न्हाऊन जा

फुलाफुलांना बहर केव्हढा

वेलिंना बघ झोंबे वारा

श्वासामध्ये भरून घेऊ

फुलारणारा विंझणवारा

तूझ्या प्रितीचे गित अनोखे त्याच्या संगे गाऊन जा

पहाट होण्या उशीर आहे गंधा मध्ये न्हाऊन जा

नकोस सांगू तुला अडविले

क्षितिजावरच्या मेघाने

वाऱ्यावरती स्वार होऊनी

ये जवळी तू वेगाने

तुला भेटण्या अधिर आहे,, गुपित मनीचे सांगून जा

पहाट होण्या उशीर आहे, गंधा मध्ये न्हाऊन जा

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861303

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@सर्व हक्क सुरक्षित

 

प्रतिक्रिया व्यक्त करा