*जागतिक मातृदिनानिमित्त कविसंमेलन दादर येथे संपन्न*
*मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
नातेसंबंधांना जिच्यामुळे परिसस्पर्श लाभतो ती म्हणजे “आई”. जगातलं सर्वोच्च आदराचं आणि परमपवित्र स्थान म्हणजे “आई”. प्रेमाच्या अथांग सागरात लेकरांच्या अगणित चूका किंवा अक्षम्य अपराध पोटात सामावून घेणारी व्यक्ती म्हणजे “आई”. ह्याच आईवर अगणित वेळा लिहिलं गेलं आहे आणि यापुढेही लिहिले जाईल. आईबद्दलच्या आपल्या भावना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मुंबईतील प्रथितयश कवयित्री सीमा विश्वास मळेकर ह्या विराजमान होत्या. त्यांचे शाल, शब्दगुच्छ अर्थात पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन कवयित्री वैभवी गावडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यावेळी शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर हेदेखील उपस्थित होते.
कविसंमेलनामध्ये स्वाती हेमंतकुमार शिवशरण, बालकवी वेदान्त यशवंत पंडित, विक्रांत मारूती लाळे, प्रसाद यशवंत कोचरेकर, वैभवी विनीत गावडे, गौरी यशवंत पंडित, जयश्री हेमचंद्र चुरी, संतोष धर्मराज मोहिते, शैलेश भागोजी निवाते, कल्पना दिलीप मापूसकर, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, आदित्य प्रदीप भडवळकर, किशोरी शंकर पाटील, सुनिता पांडुरंग अनभुले, सरोज सुरेश गाजरे, अशोक नार्वेकर आणि कविसंमेलनाच्या आयोजनाचा महत्त्वाचा भाग असलेले सनी आडेकर यांनी पहिल्या सत्रामध्ये जागतिक मातृदिनानिमित्त आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. मध्यंतरामध्ये शितलादेवी कुळकर्णी यांनी एक प्रहसन सादर करून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. चहा अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्यानंतर सगळेच कवी पुन्हा कविता सादरीकरणासाठी सज्ज झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व कवींनी आपल्या आवडीची कविता सादर करून सभागृह भारून टाकले.
कविसंमेलनच्या अध्यक्षपदी विराजमान असलेल्या सीमा विश्वास यांनी देखील आपल्या दोन रचना सादर केल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या आयोजकांच्या कार्याची दखल घेतली. त्या आपल्या मनोगतामध्ये पुढे म्हणाल्या, “आपण सर्व कवी नेहमीच सुंदर रचना सादर करण्याचा प्रयत्न करतो, यावेळीही सर्वांच्याच रचना खूप सुंदर होत्या. पण मला बालकवी वेदान्तचे खूप कौतुक करावेसे वाटते कारण त्याच्या कविता तर छान असतातच पण ह्या वयात त्याला कविता सुचतात हीच फार कौतुकाची गोष्ट आहे. वेदांत, तुला माझ्याकडून खूप खूप प्रेमळ शुभेच्छा आणि हे कवीपण असेच कायम जप आणि ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणे नक्किच मोठेपणी या क्षेत्रात तू आपला वेगळा ठसा उमटवशील असा आमच्या सर्वांकडूनच तुला आशिर्वाद आहे.” मनोगताच्या अखेरीस आयोजकांनी सुरू केलेली ही वाटचाल प्रगतीचे शिखर गाठू दे, अशी प्रार्थना करून आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता करताना ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
जून महिन्याच्या पहिल्या रविवारी पुढचे मासिक कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी अष्टपैलू साहित्यिक कल्पना मापूसकर यांची निवड करण्यात आली. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, सनी आडेकर, शैलेश निवाते, विक्रांत लाळे आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*