You are currently viewing राष्ट्रवादीच्या अर्चना घारे यांनी भालावल येथे बजावला मतदानाचा हक्क…

राष्ट्रवादीच्या अर्चना घारे यांनी भालावल येथे बजावला मतदानाचा हक्क…

राष्ट्रवादीच्या अर्चना घारे यांनी भालावल येथे बजावला मतदानाचा हक्क…

सावंतवाडी

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा भालावल येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी कोकणवासीयांनी वाढत्या उष्णतेत स्वतःची काळजी घेत लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे या निवडणुकीत हॅट्रिक करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी त्यांचे पती संदीप घारे यांनी देखील मतदानाचे कर्तव्य पार पाडले. यावेळी विनायक परब, सिद्धी परब, वैभव परब, ऋतिक परब, रजनी गवस आदी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा