You are currently viewing रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय निश्चित – दिपक केसरकर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय निश्चित – दिपक केसरकर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय निश्चित – दिपक केसरकर:

सहकुटुंब केसरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क..

सावंतवाडी

देशाचा मूड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहिला आहे. यापुढेही देश मोदींसह राहणार असून भारत बलवान देश बनणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय निश्चित आहे. सावंतवाडी मतदारसंघातून ७० हजारांहून अधिकच लीड राणेंच्या मागे उभ करणार असल्याचा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडीत सहकुटुंब त्यांनी मतदानाचा हक्क बजावला याप्रसंगी ते बोलत होते.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडी चितारआळी येथील मतदान केंद्रावर केसरकर कुटुंबियांनी मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी देशाचा मूड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहिला आहे. यापुढेही देश मोदींसह राहणार असून भारत बलवान देश बनणार आहे. मतदानाचा पवित्र हक्क जास्तीत जास्त लोकांनी बजावावा व लोकशाही अधिक बळकट करावी असं आवाहन मंत्री केसरकर यांनी केलं. कोकण एका विकासाच्या दिशेने जात आहे. शेतकरी, महिला व युवक यांचा विकास हा प्रमुख उद्देश आहे. सावंतवाडी मतदारसंघातून ७० हजारपेक्षा अधिक मताधिक्य राणेंना मिळेल. १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणे विजय निश्चित आहे असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ.पल्लवी केसरकर, कन्या सोनाली केसरकर-वगळ, जावई सिद्धार्थ वगळ, नातू अर्जून वगळ, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शुभांगी सुकी, मनोज नाईक, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा