You are currently viewing भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय पातळीवरील फायरिंग स्पर्धेसाठी मालवणच्या हर्षदा पवार हिची निवड…

भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय पातळीवरील फायरिंग स्पर्धेसाठी मालवणच्या हर्षदा पवार हिची निवड…

भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय पातळीवरील फायरिंग स्पर्धेसाठी मालवणच्या हर्षदा पवार हिची निवड…

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयच्या एनसीसी विभागाची विद्यार्थिनी..

मालवण
भारतीय सैन्यामार्फत घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील फायरिंग स्पर्धे मध्ये महाराष्ट्रातून २४ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये मालवण मधील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिची निवड झाली आहे. आतापर्यंत बटालियन आणि ग्रुप मधून तीन राउंड यशस्वी पूर्ण करून चौथ्या राऊंडसाठी तिची निवड झाली आहे.

महाराष्ट्र मार्फत २४ विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये हर्षदा पवारचा समावेश आहे. यासाठी ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गचे कमांडर ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, व इतर सर्व सैन्य अधिकारी यांचे सहकार्य लाभले. हर्षदा पवार ही ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग मार्फत या स्पर्धेत उतरली आहे. तिला स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत यांचे मार्गदर्शन लाभले.

द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत हर्षदा शिकत असून त्याचबरोबर तिने महाविद्यालयाच्या एनसीसी मध्येही सहभाग घेतला आहे. एनसीसी मार्फत हर्षदा वेगवेगळ्या फायरिंग स्पर्धा व इतर एडवेंचर कॅम्प मध्ये सातत्याने सहभागी होऊन महाविद्यालयाला भरभरून यश प्राप्त करून देत आहे. तिच्या या यशा बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराम ठाकूर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ. सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे आणि इतर संस्था पदाधिकारी यांनी हर्षदा पवार हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा