मालवण कोळंब येथे १२ रोजी फार्मसिस्ट रिफ्रेशर कोर्सचे आयोजन…
सिंधुदुर्ग केमिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल यांचा संयुक्त उपक्रम..
मालवण
सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १२ मे रोजी मालवण तालुक्यातील कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात फार्मासिस्ट रिफ्रेशर कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.
औषध व्यवसायात वेगाने होणारे बदल, ड्रग अँड कॉस्मेटिकमध्ये होऊ घातलेले नविन बदल तसेच व्यवसायात येणाऱ्या भविष्यातील स्पर्धेला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी प्रत्येक फार्मासिस्टने आपले ज्ञान अद्यावत ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी पर्यायाने भविष्यात आपल्या व्यवसायात येणाऱ्या स्पर्धेला आणि व्यावसायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला फार्मसीस्ट सक्षम व्हावा व्हावा या उद्देशाने स्टेट फार्मसी कौन्सिल मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फार्मासिस्टसाठी रिफ्रेशर कोर्सचे आयोजन केले आहे.
तसेच यापुढे फार्मासिस्टसाठी अनिवार्य असलेले फार्मासिस्ट प्रोफेशनल प्रोफाइल कार्ड करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल प्रत्येक फार्मासिस्टसाठी असे रिफ्रेशर व फार्मासिस्ट कौन्सिलिंग कोर्स करणे बंधनकारक करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फार्मासिस्टनी या फार्मासिस्ट रिफ्रेशर कोर्सचा लाभ घ्यावा. तसेच या रिफ्रेशर कोर्सच्या रजिस्ट्रेशनसाठी प्रत्येक तालुक्यातील जिल्हा कार्यकारणी सदस्य व तालुका पदाधिकारी यांच्याकडे आपले नाव नोंदवावीत असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम आणि सचिव संजय सावंत यांनी केले आहे.