You are currently viewing नीलगिरी ट्रेक कॅम्पसाठी श्रृती जामसंडेकर हिची निवड…

नीलगिरी ट्रेक कॅम्पसाठी श्रृती जामसंडेकर हिची निवड…

नीलगिरी ट्रेक कॅम्पसाठी श्रृती जामसंडेकर हिची निवड…

कणकवली

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट विद्यार्थिनी श्रृती जामसंडेकर हिची तामिळनाडू येथे होणाऱ्या नीलगिरी ट्रेक कॅम्पसाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे. यानिवडीबद्दल तिचे सर्वस्तरांतून कौतूक होत आहे.

श्रृती जामसंडेकर हिचे. खारेपाटण हायस्कूलच्यावतीने मुख्याध्यापक संजय सानप यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, एल. के. हरयान, एनसीसी ऑफिसर रामदास कापसे आदी उपस्थित होते.
16 ते 23 मे याकालावधीत तामिळनाडू येथे होणाऱ्या नीलगिरी ट्रेक कॅम्पकरिता श्रृती जामसंडेकर ही लवकरच रवाना होणार आहे. तिला रामदास कापसे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सचिव महेश कोळसुलकर यांच्या मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा