You are currently viewing पेंडूर, वराड गावचे ग्रामदैवत श्री देव वेताळाचे दर्शन घेत विनायक राऊतांचे विजयासाठी साकडे

पेंडूर, वराड गावचे ग्रामदैवत श्री देव वेताळाचे दर्शन घेत विनायक राऊतांचे विजयासाठी साकडे

मालवण :

 

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी मालवण तालुक्यातील ग्रामदैवत श्री देव वेताळ मंदिर वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थिती दर्शवत श्री देव वेताळाचे दर्शन घेतले. आणि वेताळचरणी लोकसभा निवडणूक विजयासाठी साकडे घातले.

यावेळी मंदार केनी, बाळा राऊत, अमित रेगे कुलकर्णी, वंदेश ढोलम, दर्शन म्हाडगुत, शेखर रेवडेकर, नितीन राऊळ, नाना राऊळ, मनोज राऊळ, शाखाप्रमुख महेश परब, शांती नाईक, संतोष परब, रामू सावंत तसेच देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विनायक राऊत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच याच दौऱ्या दरम्यान वराड वावुळवाडी येथील म्हाडगुत कुटुंबीय याचे कुलदैवत व वराड गावचे ग्रामदैवत श्री देव वेताळाचे दर्शन विनायक राऊत यांनी घेतले यावेळी वराड गावचे राजू घाडी, आप्पा परुळेकर, विनोद आळवे, अशोक परब, किशोर भगत, वैभव म्हाडगुत, समीर म्हाडगुत, देवेंद्र म्हाडगुत व अन्य कार्यकर्ते , ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा