*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझ्या विना…*
वाटलं नव्हतं कधी मला,
रहावं लागेल एकटं एकटं!
तुझ्या शिवाय जगताना,
मन झालंय रितं रितं!…१
तुझ्या विना रहाताना,
दिवस झालाय मोठा मोठा!
राहिले तुझ्या भोवती भोवती,
आता काळ वाटतो फार मोठा!…२
तुझे माझे स्वतंत्र जग,
रमलो त्यातच काही काळ!
वाटले नव्हते होईल ताटातूट,
भ्रम होता तो, कळते आज !…३
गृहीत धरले मनात जणू,
काळ काही बदलणार नाही!
असेच असू कालातीत,
एकाच वेळी संपेल दोन्ही!….४
जेव्हा पहाते बाहेरील जग,
समजावते मी मनाला !
सुख दुःखाने भरल्या जगात,
परमेश्वर च आहे साथीला!…५
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे