*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
मनीमाऊचं लगीन
मनीमाऊचं लगीन ठरलं
एका बोकोबाशी
वराडी मंडळी आलेली
लग्नाला खाशी
वराडात वाघोबाचा
होता मोठा मान.
तो म्हणाला द्या मला
मसाल्याचं पान.
पान दिल्यावर तो म्हणे
पाहिजे एक हरिण
नाहीतर लग्नात मी
गोंधळच करीन.
असं आणलं वाघोबाने
लग्नात विघ्न.
तरी होते वराडी
खाण्यापिण्यात मग्न.
नवरदेव बोकोबाने
मग केलं काय.
जाळ्यामध्ये अडकवला
वाघोबाचा पाय.
मग बोकोबाचं
लगीन झालं थाटात
दोघं खीर खाऊ लागली
नंतर एकाच ताटात.
अनुपमा जाधव.