*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*
*जीवनातील जाणिवा नेणिवा*
***************************
जाणीव आणी नेणिवांच्या या मर्त्य संसारात , खरंतर अंती प्रत्यक्षात सुखदुःखसंवेदनांचाच निचरा होत असतो आणि *चैतन्याचा प्रसन्न आविष्कार होतो अचेतन.*
अनंत जन्मानंतर मानवी जन्म प्राप्त होतो असे म्हणतात. आणि सर्व जीवसृष्टीत मानवी जन्म हा श्रेष्ठ मानला जातो. मानवी जीवनातील सारी स्थित्यंतरे आपण पाहतो. शिशु , शैशव ,बाल्य , पौगंड , तारुण्य , ग्रहस्थावस्था, जरावृद्धत्व ,आणि अटळ अंत या सुख,दुःख, संवेदनांच्या अवस्थेतून प्रत्येक जन्म जात असतो आपली कालक्रमणा करीत असतो. हे वास्तव आहे…!
दैवजात प्रारब्ध , कर्म , संचित , भोग ,पाप , पुण्य या कल्पनेतून आपण आपले जीवन सुरू असते हे वास्तव आहे.
*साऱ्या षड्रिपूवर विवेकी सामर्थ्याने मात करून जीवन जगण्यात पुरुषार्थ आहे.* हे आपण आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीतुन , धर्मग्रँथातून ऐकले आहे वाचले आहे. रामायण , महाभारत , भगवतगीता , ग्यानेश्वरी , गाथा, यातील सारे दृष्टांत म्हणजे मानवी जीवनातील नात्यांची , भावनांची विलक्षण गुंतागुंत आणि संतत्वी विचारांचे कल्याणप्रदी असे प्रबोधात्मक विवेचन असेच म्हणावे लागेल.
*पण वास्तविक जीवनातील भौतिक सुखासाठी तडफडणारी अशी केविलवाणी असह्य धडपड म्हणजे एक भावनिक क्षणभरी सुखदुःखातील विषण्ण दारुणतेच सत्यदर्शन असतं.*
अशा भग्नावस्थी मनसंवेदनांना सतत सावरायचा पराकोटीचा प्रयत्न आपण प्रत्येक जण करीत असतो.
*पण भोगणे आणि फक्त निःशब्दी भोग भोगणे एवढेच काय ते आपल्याला व्याकुळ करून जात असतं. हीच नियती असते.*
*पराधिनतां हेच एकमेव जीवनाचं निर्मळ वास्तव असतं…!!*
*आत्मचिंतनाची दोरी किती कितीही महत्प्रयासाने ताण ताणली तरी या आसक्त पण व्यर्थ संसारात डुंबता डुंबता बुडणं हे वास्तव आहे की जे आपण कुणीच नाकारू शकत नाही .*
जन्ममृत्यूच्या पालखित बसून आपण सारेच हा जीवनप्रवास अनुभवत असतो. आणि या अटळ जाणीव नेणिवांच्या संवेदनांना रोजच मिठीत घेत असतो.
*आणि हेच जीवन असतं…!*
यालाच जगणं म्हणजे *ईश्वरईच्छा म्हणून समजून घ्यायचं असतं* आणि प्रत्येक क्षणाला तीच संचिती प्रारब्धकृपा मानून मिठीत घ्यायचं असतं….!!!
*हाच जीवनातील सत्यार्थी दृष्टांत आहे.*
काळाचे कालचक्रच हे अखंडित अविश्रांत चालूच असतं , दोन्ही बाहू पसरून आपणच त्याच समाधानानं स्वागत करायचं असतं..!!
सूर्यप्रकाशा सारखं शाश्वत सत्य तेच एक असतं की *जो अगाध आहे , अतर्क्य आहे , अनाकलनीय आहे त्या अनामीक आदिशक्तीच श्रद्धेने नामस्मरण करणं एवढंच एक सत्यसात्विक सुखस्वरूप चिदानंदी साक्षात्कारी परमसुख असतं…!!!*
आणि त्यातुनच..……….. *आनंदमोक्षमुक्तीची* अनुभूती येत असते…..
जीवनातील भय , चिंता , असूया , दुःख ,वियोग स्वार्थासक्ती अशा जीवनातील अनेक प्रत्ययाकारी घटनातुन आपण अंतर्मुख होवून स्वतःला सावरणं आणि प्राप्त जीवनावस्थेला अलवार कवेत घेणं हाच एक सकारात्मक सामंज्यस्सी विवेक असतो..
*आणि तीच विवेकी बुद्धी मानवाला सर्वार्थाने सावरते आणि मग जीवनाचा सत्यार्थ उमगतो. आणि प्रगल्भतेतून निर्मोही जीवन म्हणजे काय ते कळते*
सरते शेवटी *इदं न मम , आहे तितुके देवाचे* ही भावनां अंतःकरणात रुजते.
*आणि नंतर ” जन्म आणि मृत्यु हा एक प्रवास आहे ” आणि तो अटळ असून प्रत्येकाला करावाच लागतो. म्हणून जीवनात मानवतेचा विचार रुजवीत , सत्कर्म करीत संचित रचत जावे एवढेच आपल्या हाती असते. हे मात्र खरं..!!!!*
*****************************
*इती लेखन सीमा..*
*#©️ *वि.ग.सातपुते.*
*अध्यक्ष: महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे*
*📞( 9766544908)*