भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना श्रावण गवळीवाडी ग्रामस्थांचा एकमुखी पाठींबा
भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक ; पाण्याचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही
मालवण
लोकसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मालवण तालुक्यातील श्रावण गवळीवाडी येथील ग्रामस्थांनी एकमुखी पाठींबा जाहीर केला आहे. येथील ग्रामस्थांची बैठक भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या प्रश्नांचे दत्ता सामंत यांनी समाधान करून वाडीतील पाण्याचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली. याठिकाणी १५० मीटर रस्त्याचा प्रश्न देखील कायम आहे. या रस्त्यावर ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी दुलाजी परब यांनी माती पसरून ठेवली आहे. ह्या रस्त्याचे काम प्रलंबीत आहे. हे काम स्वतःला अथवा ठाकरे गटाच्या आमदार, खासदारांच्या निधीतून करता येत नसेल तर श्री. परब यांनी मान्य करावे, मी स्वतः च्या पैशातून हा रस्ता करून देतो, असे आव्हान दत्ता सामंत यांनी दिले.
यावेळी स्थानिक भाजपा नेते बाळू कुबल, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष सुशांत घाडीगावकर, शक्ती केंद्रप्रमुख निलेश बाईत, उद्योजक विनायक बाईत, प्रशांत परब, राजेश तांबे, जॉन नरोन्हा यांच्यासह माजी सरपंच दीपाली पाटकर, हर्षदा चव्हाण, विजय गवळी, बबन गावकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या समस्या मार्गी लावण्याचा शब्द दत्ता सामंत यांनी दिला. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एकमुखी पाठींबा ग्रामस्थांनी दिला.