*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अशी असावी मैत्री कोवळी*
मनात नसावे किल्मिश काही
सहकार्याची भावना जपावी
अशी असावी मैत्री “कोवळी”
कधी कुणाची दृष्ट न लागावी
असो कोणता टप्पा वयाचा
हिशेब नाही आता करायचा
फेकून द्यायचे मतभेद आधीचे
गळ्यात गळा सदा घालायचा
उंडारून झाले लहान पणाचे
आता सर्वांनी सावध रहायचे
संसार नसतो फक्त “आपला”
विश्वालाही *गृहीत* धरायचे
मैत्री झाली अधीक समंजस
वाहून गेले मत भेदाचे पाणी
बलवान करूया राष्ट्र आपले
शत्रूला पाजुया आपण पाणी
मैत्री नसते अडीच शब्दांची
असतो दडलेला अर्थ छुपा
हृदयाला पहा कान लावूनी
मित्राची असे निखळ कृपा
विनायक जोशी 🥳ठाणे
मीलनध्वनी/९३२४३२४१५७