You are currently viewing नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीची रॅलीला सावंतवाडी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद…

नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीची रॅलीला सावंतवाडी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद…

नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीची रॅलीला सावंतवाडी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद…

सौ. नीलम राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीचा केला शुभारंभ: मंत्री दीपक केसरकर,निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती…

सावंतवाडी :

लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरात गुरुवारी सायंकाळी भव्य रॅली काढण्यात आली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सौ. निलम राणे यांच्या हस्ते तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. महायुतीच्या प्रचार कार्यालयापासून सुरू करण्यात आलेली ही रॅली संपूर्ण सावंतवाडी शहरात काढण्यात आली. या महारॅलीत शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते महिला व नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत नारायण राणे यांच्या विजयाचा संकल्प केला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

या रॅलीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोंसले, विधानसभा प्रमुख राजन तेली, युवा नेते विशाल परब, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख ॲड नीता सावंत, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर,मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश मनोज नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश गवस, गुणाजी गावडे, तालुकाध्यक्ष उदय भोसले, संध्या तेरसे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, शिवसेनेच्या उपसंघटक अर्चना पांगम, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, शिवसेना शहर प्रमुख तसा माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, भाजपा शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, सौ. मोहिनी मडगावकर,माजी उपनगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, आनंद नेवगी, नासीर शेख, सुरेंद्र बांदेकर, गुरुदास मठकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, मंदार नार्वेकर, संतोष गांवस, केतन आजगावकर, राघू चितारी, अशोक पवार, निशिकांत तोरस्कर, बंटी पुरोहित, सत्यवान बांदेकर, परिक्षीत मांजरेकर, तेजस माने, सुमित वाडकर, हेमंत बांदेकर, देव्या सुर्याजी, अर्चित पोकळे, प्रतिक बांदेकर, नंदू शिरोडकर,
परीक्षित मांजरेकर, ॲड. राजू कासकर, श्रीपाद सावंत, बंडया केरकर, रवि नाईक, विनोद सावंत यांच्यासह सावंतवाडी शहरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीच्या सुरुवातीला असलेल्या ढोल पथकामुळे या रॅलीला विजयी रॅलीचे स्वरूप प्राप्त झाले होते. रॅलीत सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या. ‘ नारायण राणे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, ‘ खणखणीत नाणे, नारायण राणे ‘ अबकी बार चारसो पार ‘ फिर एक बार मोदी सरकार, दीपक केसरकर आगेबढो…’ भारत माता की जय, अशा घोषणांनी सावंतवाडी शहर परिसर दुमदुमून गेला होता. सावंतवाडी शहरात रॅली जात असताना महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीत सहभागी होत होते. याप्रसंगी मंत्री दीपक केसरकर म्हणाले, नारायण राणे यांचा विजय हा निश्चित आहे. नरेंद्र मोदींना देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. सावंतवाडी शहरात भाजप सोबत असल्यानं किमान ८० टक्केहून अधिक मतदान हे राणेंना देणार असल्याचा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा