You are currently viewing सोनाळीत उबाठा गटाला धक्का : असंख्य कार्यकर्ते भाजपात डेरेदाखल

सोनाळीत उबाठा गटाला धक्का : असंख्य कार्यकर्ते भाजपात डेरेदाखल

सोनाळीत उबाठा गटाला धक्का : असंख्य कार्यकर्ते भाजपात डेरेदाखल

आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे केले स्वागत

वैभववाडी
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सोनाळी गावातील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे सोनाळीत उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. या प्रवेशामुळे सोनाळीत भाजपाची ताकद आणखी वाढली आहे.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये मुरारी आकाराम शिंदे, वैभव मुरारी शिंद, मंगेश जाधव शिंदे, आनंद दत्ताराम शिंदे, सुजय सहदेव शिंदे, संदेश आनंद शिंदे, आनंद काशीराम शिंदे, सुधाकर भाऊ शिंदे, दत्ताराम शांताराम मोरे व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
प्रवेश करतेवेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, माजी सभापती अरविंद रावराणे, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश शेलार, बुथ अध्यक्ष समाधान जाधव, सुरेश तळेकर, शांतेश रावराणे व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा