लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदानादिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी
सिंधुदुर्गनगरी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी / कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे माहिती सरकारी कामगार अधिकारी यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व आस्थापना कारखाने, दुकाने (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे. नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) सर्व आस्थापनांनी, कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
वर नमूद केल्यानुसार उदयोग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना. कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.