You are currently viewing प्रत्येकाने स्वतःच्या प्रामाणिक कामातून उज्ज्वल महाराष्ट्र घडवावा!” – संजय शितोळे

प्रत्येकाने स्वतःच्या प्रामाणिक कामातून उज्ज्वल महाराष्ट्र घडवावा!” – संजय शितोळे

*”प्रत्येकाने स्वतःच्या प्रामाणिक कामातून उज्ज्वल महाराष्ट्र घडवावा!” – संजय शितोळे*

पिंपरी (दिनांक : ०१ मे २०२४)

“प्रत्येकाने स्वतःच्या प्रामाणिक कामातून उज्ज्वल महाराष्ट्र घडवावा!” असे आवाहन पी.डी.सी.सी. बॅंकेचे जनरल मॅनेजर संजय शितोळे यांनी गणेशनगर, थेरगाव येथील खिंवसरा – पाटील शैक्षणिक संकुलात बुधवार, दिनांक ०१ मे २०२४ रोजी प्रमुख अतिथी म्हणून केले. महाराष्ट्र दिन, कामगारदिन आणि शिक्षकेतर कर्मचारी पंडित गायकवाड यांचा सेवापूर्ती समारंभ अशा त्रिवेणी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, शालासमिती अध्यक्ष नितीन बारणे, सेवानिवृत्त शिक्षिका माधुरी कुलकर्णी, शिक्षकेतर कर्मचारी पंडित गायकवाड, आशा गायकवाड, गोवर्धन गायकवाड, अनुराधा गायकवाड, अतुल आडे, चिंचवडविभाग मुख्याध्यापिका वर्षा जाधव, पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

मान्यवरांच्या शुभहस्ते भारतमाता पूजन, ध्वजपूजन करण्यात आले. मुख्याध्यापक नटराज जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, संविधान उद्देशिका, समूहगीत यांचे सादरीकरण केले. इयत्ता ६ वी मधील केतन सांगडे या विद्यार्थ्याने आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतामधून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे शब्दरूप चित्र सादर केले. सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार यांनी कवितेतून पंडित गायकवाड यांना निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या; तर अश्विनी बाविस्कर, वर्षा जाधव, माधुरी कुलकर्णी, आशा थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.

समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे आणि शालासमिती अध्यक्ष नितीन बारणे यांनी पंडित गायकवाड यांना सेवापूर्ती निमित्त भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. पालकांना महाराष्ट्रदिनाच्या, कामगारदिनाच्या शुभेच्छा दिल्या; तसेच देशहितासाठी मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. यावेळी बालविभाग ते इयत्ता ९ वी या वर्गांमधून वार्षिक परीक्षेमध्ये सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला; तसेच इतर विद्यार्थ्यांना निकालाचे वितरण करण्यात आले. शाळेत विविध क्रांतिकारक, समाजसुधारक यांच्या प्रतिमा घेण्यासाठी निवृत्त शिक्षिका माधुरी कुलकर्णी यांनी पंचवीस हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले. ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवापूर्ती निमित्त पंडित गायकवाड यांना शाळेतर्फे आरामखुर्ची, पूर्ण पोशाख तसेच कुटुंबातील सदस्यांना स्नेहपूर्वक भेटी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या सन्मानाला प्रतिसाद म्हणून आशा गायकवाड आणि गोवर्धन गायकवाड यांनी समिती तसेच संकुलाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी प्रास्ताविक केले. सहशिक्षिका स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सहशिक्षिका अंजली सुमंत यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा