*भाजपा भटके विमुक्त आघाडी दोडामार्ग तालुका महिला अध्यक्ष सौ शितल धाकू काळे यांची निवड*
*सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी दिले नियुक्त पत्र*
भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने दोडामार्ग तालुक्याच्या महिला आघाडी अध्यक्षपदी सौ शितल काळे यांची निवड करण्यात आली केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री भाजप नेते रवींद्र चव्हाण साहेब, माजी खासदार निलेश राणे साहेब, आमदार नितेश राणे साहेब, माजी आमदार राजन तेली साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी राहुल भैया केंद्रे यांच्या मान्यतेने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या सूचनेने भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवल राज काळे यांनी सौ शितल काळे यांची निवड केली जाहीर. सौ शितल काळे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा तसेच व्यापक अनुभवाचा उपयोग पक्ष संघटनेच्या कार्यावाढीसाठी निश्चितपणे होईल तसेच त्यांना दिलेले जबाबदारी त्या सर्वांना सोबत घेऊन यशस्वी त्या पार पडतील व पक्ष संघटना तळागाळातल्या कार्यकर्त्यां पर्यंत पोहोचवतील असा विश्वास काळे यांनी नियुक्ती पत्रात व्यक्त केला आहे. सौ काळे यांचे तालुका महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.