1 मे कामगार दिनी कणकवली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन…
कणकवली
जागतिक कामगार दिन म्हणून विविध संघटनांतर्फे १ मे हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीही यादिवशी कणकवली शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. कामगार मेळावाही घेण्यात येणार आहे.
मतदार जागृती अभियान या उपक्रमांतर्गत बुधवारी १ मे रोजी सकाळी कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी ५ ते ६ या वेळेमध्ये कामगार मेळावा हॉटेल हॉर्नबिल सभागृहामध्ये आयोजित केला आहे. विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहून यावेळी सर्व सभासदांनी मार्गदर्शन करतील. कामगार चळवळीसमोर खासगीकरण तसेच, कामगार कपातीसारखे मोठे संकट उभे आहे. जागतिक आर्थिक भांडवलाच्या रेट्यामुळे कामगार भरती पूर्णपणे बंद असून सर्व प्रकारचे काम आऊटसोर्स पद्धतीने करण्यात येते. कामगार चळवळीसमोर या धोक्याची चर्चाही यावेळी केली जाणार आहे. तसेच यापुढील लढ्याचे सूत्र ठरविण्यात येणार आहे. सर्व सभासदांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक धीरेश काणेकर, निखिल साटम, सुनील राऊत, मनोज निग्रे यांनी केले आहे.
WhatsApp Facebook