You are currently viewing उबाठा गटाचे निष्क्रिय अकार्यक्षम आम. वैभव नाईक आणि विद्यमान खास. विनायक राऊत यांच्यामुळेच धनगर वस्त्या अविकसित

उबाठा गटाचे निष्क्रिय अकार्यक्षम आम. वैभव नाईक आणि विद्यमान खास. विनायक राऊत यांच्यामुळेच धनगर वस्त्या अविकसित

*दहा वर्ष काम न केल्यामुळेच लोकसभा निवडणूकीवर मालवण धनगर समाजाचा बहिष्कार*

 

*भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे*

 

मालवण :

काही दिवसापूर्वी वेरळ धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी रस्ता व इतर विकासकामे न झाल्यामुळे 07 मे 2024 होणाऱ्या लोकसभा निवडणुक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आम. वैभव नाईक यांनी वेरळ येथे झालेल्या खळा बैठकीत या समाज बांधवांना तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत निवडणूक झाल्यानंतर आम्ही तुमचे कामे करू अशा प्रकारचे आश्वासन दिले असे वृत्तपत्रात वाचनात आले. निवडणुकी पुरता या उबाठा गटाच्या आमदार खासदार यांना आमचा धनगर समाज, भटके विमुक्त समाज आठवतो. गेली 10 वर्ष यांनी एक ही विकास काम धनगर वाडीवर या आमदार खासदार यांच्या माध्यमातून झालेले नाही याला सर्व जनता साक्ष आहे अश्या निष्क्रीय आमदार खासदार यांना माझा थेट सवाल आहे. गेले दहा वर्ष कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार उबाठा चे आहेत. आणि ते 7.5 वर्ष राज्यात सत्तेत होते. 10 वर्ष खासदार उबाठा गटाचे आहेत अन तेही 5 वर्ष केंद्रात सत्तेत होते. वेरळ ग्रामपंचायत मध्ये सरपंच ही काल पर्याय उबाठा चे होते मग हे रस्ते व इतर कामे का झाले नाही यांचे उत्तर उबाठा गटाचे आमदार खासदार यांनी द्यावे.

राज्यात महायुतीचे सरकार आल्या नंतर सिंधुदूर्ग जिल्ह्यात तांडा वस्तीच्या माध्यमातून 03 कोटी 36 लाख रुपये मंजूर झाले असून यातून वेरळ धनगर वाढीसाठी तांडा वस्ती सुधार योजनेतून 05 लाख आणि जिल्हा नियोजन मधून 05 लाख असे 10 लाख रुपये मंजूर आहेत. यासाठी भटके विमुक्त आघाडीच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांच्या कडे पाठपुरावा करण्यात आला होता.

संबंधित निधीच्या विनीयोगाची प्रक्रिया चालू आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी श्री नवलराज काळे यांनी दिली.

सध्या वेरळ धनगर वस्तीवरून निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार जो टाकण्यात आला आहे. त्याचं सर्व श्रेय उबाठा गटाचे निष्क्रिय अकार्यक्षम विद्यमान आमदार वैभव नाईक आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांचे आहे. गेले दहा वर्ष हे धनगर वस्तीला न्याय देऊ शकलेले नाही याची प्रचिती म्हणजेच वेरळ धनगरवाडी ने टाकलेला निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार हे उत्तम उदाहरण आहे.

निश्चितपणाने येणाऱ्याकाळात कुडाळ मालवण मतदारसंघांमध्ये आमलाग्र बदल झाल्यास या विधानसभा मतदारसंघांमध्ये कमळ चिन्ह फुलल्यास कुडाळ मालवण तालुक्यातील सर्व भटके विमुक्त जाती-जमातींच्या वाडी वस्तींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आमचे नेते केंद्रीय मंत्री लोकसभा उमेदवार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार डॉ.निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी राहुल भैया, केंद्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी बाळासाहेब गोसावी यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली मी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी नवलराज विजयसिंह काळे कटीबद्ध राहणार असे आश्वासन या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील भटके विमुक्त जाती जमातीतील मतदार बंधू-भगिनींना देत आहे. आपल्या कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी, देशाच्या भविष्यासाठी आपले अमूल्य एक मत देशाच्या सक्षम नेतृत्वाला कार्यक्षम कर्तुत्वाला म्हणजेच नरेंद्र मोदी यांना व कोकणचे भाग्यविधाते कार्यसम्राट रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा, असे देखील आवाहन जिल्हा अध्यक्ष श्री नवलराज काळे यांनी मालवण येथील झालेल्या भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदूर्ग जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठकीत केले. यावेळी मालवण कार्यालयात उपस्थित प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, भाई मांजरेकर, सौ वेरळकर मॅडम, वेरळ ग्रामपंचायत सरपंच धनंजय परब, वेरळ गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री भोगले, भाजपा भटके विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष भरत माने, तालुका शहराध्यक्ष अशोक मोहिते, तालुका सरचिटणीस मंगेश वरक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा