सिंधुदुर्ग :
वर्षअखेर असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची संख्या तसेच गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन ही गाडी सुरू करण्यात आलीय. आजपासून (रविवार) ते ३१ जानेवारीपर्यंत ही गाडी चालवण्यात येणार आहे. पुणे-एर्नाकुलम (०२०५१) ही गाडी दर बुधवारी आणि रविवारी धावेल, तर एर्नाकुलम-पुणे (०२०५२) ही गाडी दर शुक्रवार आणि मंगळवारी चालवण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर आजपासून (रविवार) एक विशेष गाडी चालवण्यात येत असल्याची घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आलीय. पुणे-एर्नाकुलम आणि एर्नाकुलम-पुणे या मार्गावरून ही विशेष गाडी चालवण्यात येईल.
विशेष म्हणजे ही गाडी कणकवली आणि सावंतवाडी या स्थानकांत थांबणार आहे. पुण्याहून एर्नाकुलमला जाणारी रेल्वे ही संध्याकाळी ६.४५ वाजता पुण्यातून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता एर्नाकुलमला पोहोचेल. तर एर्नाकुलमवरून निघणारी रेल्वे ही तिथून पहाटे ५.१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता पुण्यात पोहोचेल.