कण रगडता वाळूचे…!
शालेय जीवनात पडलेला एक गहन प्रश्न.
‘कण रगडता वाळूचे, तेल ही गळे’..!
शाळेच्या भिंतीवर सुंदर व सुवाच्छ अक्षरात लिहलेली ही म्हन आमच्या नजरेस राहून-राहून तिच्या कडे आकर्षीत करत असे.
खरे पाहता, वाळूला कितीही रगडले तरी, वाळूच्या कणांतुन कधीच तेल निघत नाही. हे तुम्हां-आम्हाला आता चांगले ठाव आहे.
मात्र, त्यावेळी आमच्या बुद्धीला भेडसावत ठेवणारा हा गंभीर प्रश्न…!
वाळू कोणी रखडली असेल..? कशी रगडली असेल..? आणि याहून सर्वात मोठा प्रश्न, ‘तेल किती गळले असेल’…!
तात्पर्य असे की, शालेय जीवनात बाल मनावर विविध संस्कार होत असतात.
आणि त्याच बरोबर, बाल मनावर विविध घटना अधिराज्य करत असतात.
आपण जस-जसे मोठे होत जातो, तस-तसे आपल्या जीवनात अनेक घटना घडून नव-नवीन प्रत्यय देत असतात.
या सर्व अनुभवातून आपले जीवन मार्गक्रम होत जाते. आणि यालाच आपण ‘जीवानुभव’असे म्हणत असतो. याच जीवनुभावातून चालत आलेला जन्म-मृत्यचा हा जीवन प्रवास अविरतपणे अद्यावत सुरु आहे.
‘कण रगडता वाळूचे, तेल ही गळे’…!
शालेय जीवनात पडलेला, हा बाल प्रश्न, आजही आमची पाठ सोडावयास तयार नाही..! कधी-कधी कळत- नकळत आम्हाला आमच्या बालपणात घेऊन जातो. आणि पुन्हा, आम्हाला ते दिवस आठवतात… !
……………………………….
बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि. बुलढाणा