*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”वीर हनुमान”*
श्रीराम भक्त दास वीर हनुमान
प्रभुं साठी अर्पिले सर्वस्व जीवन।।धृ।।
अंजनी माता होती तपांत मग्न
यज्ञातून झाला अग्निदेव प्रसन्न
चैत्र पौर्णिमेला झाला मारुतीचा जन्म।।1।।
गेला प्रातः सूर्य धराया फळ समजून
इंद्रान फेकले वज्र कपिच्या दिशेनं
हनुवटी छाटली म्हणून नाव हनुमान।।2।।
जंबू माळी अक्ष धूम्राक्षादी वध करून
रावणा केले बेशुद्ध केले लंका दहन
द्रोणागिरी पर्वत आणिला उचलून।।3।।
मारुती सर्व व्याकरण सुत्रे प्रवीण
अकरावा व्याकरण तज्ञ सर्वज्ञ
चतुर वक्ता संभाषणात निपुण।।4।।
सीतामाई भाळी लावी सिंदूर हेतूनं
श्रीरामाचे आयुष्य वाढावे म्हणून
हनुमान शेंदूर लावी स्वामी निष्ठेनं।।5।।
प्रताप दास वीर मारुती बलवान
पंचमुखी करी पाच दिशांचे रक्षण
श्रीरामा पुढे विनम्र उभा कर जोडून।।6।।
श्री अरुण गांगल कर्जत रायगड, महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.