*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम मालवणी कविता*
*इलेक्शन..*
इलेक्शनाचे दिवस इले
निजेतसून जागे होवया
ताकद आपल्या मताची
एका दिवसात दाखवया
मता होई म्हणान दिसरात
ते येतीत गल्ली बोळात
मतांसाठी पैसे घेवन मग
राजाच गटारात लोळात
पाच वर्षात एकच संधी
तेंका लुटाची ही मिळता
इचार बुरसाटलेले म्हणान
तो तुमचेच हक्क गिळता
देवळाच्या सभामंडपांनी
सभा शपथी सुद्धा घेतीत
पैशांपुढे देव खोटो पडता
शेवटी हातात तुरीच देतीत
घराघराच्या वसरेर राती
बसतीत बैठकींचे फॅड
दारू नि मटणाच्या हाडकीत
करतीत गोरगरीबाक मॅड
झिलाक नोकरी घराक मदत
आश्वासनांची झाली खिरापत
दिली कोणी, गावली कोणाक
ऱ्हवली खय मग नेत्याची पत
इलेक्शनच्या आधी तुमका
सगळाच गावात स्वस्तात
एकदा दाबा तेंचा बटान
मगे दिस्तत अवगुण रक्तात
फुशारके, पोकळ गजालीन
छाती इंचा इंचान वाढता
खोट्याचा खरा करून नेतो
एकमेकाची उनिदुनी काढता
©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६