You are currently viewing अकोल्याच्या बाबूजी देशमुख वाचनालयाचा उपक्रम

अकोल्याच्या बाबूजी देशमुख वाचनालयाचा उपक्रम

**अकोल्याच्या बाबूजी देशमुख वाचनालयाचा उपक्रम* ==============
*यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा केला सन्मान……..*
*
अकोला

स्पर्धा परीक्षेमध्ये विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. तो करत असताना एक प्रकारचा संयम आणि शांत मनाने विविध प्रकारच्या प्रश्नांना परिस्थितीला सामोरे जावे लागते म्हणजे त्या परीक्षेत आणि नंतर प्रत्यक्ष नोकरीवर लागल्यानंतर समाजातील विविध प्रश्नांना तोंड देण्याची क्षमता नक्कीच प्राप्त होते ,असे विचार बाबूजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी नुकतेच येथे व्यक्त केले.
बाबूजी देशमुख वाचनालय ,अकोला आणि मिशन आयएएस , यांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभाच्या प्रसंगी श्री भुईभार बोलत होते. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून या परीक्षेमध्ये अकोल्यातील सुपुत्र ऋषिकेश विजय ठाकरे आणि अमरावती येथील क्षितीज संजय गुरभेले यांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री भुईभार बोलत होते.
याप्रसंगी विचारपीठावर सुप्रसिद्ध उद्योगपती आणि अकोला जनता बँकेचे माजी अध्यक्ष श्री रमाकांतजी खेतान, मिशन आय एएस चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र, कार्यकारणी सदस्य विनोद अग्रवाल व डॉ. मोहन खडसे आणि सत्कारमूर्ती उपस्थित होते. प्रारंभी सर्व पाहुण्यांचे व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केल्यानंतर सोहळ्याचे प्रास्ताविक सचिव अनुराग मिश्र यांनी केले. सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचवेळी अतिथी म्हणून उपस्थित असलेले श्री रमाकांतजी खेतान म्हणाले की कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या व्यवस्थेत सरकारी अधिकारी कार्यक्रमाचे ,धोरणाचे नियोजनात सहकार् करतात आणि ते यशस्वीपणे पार पाडण्याचे काम करतात. त्यांच्याकडूनही समाजाला अनेक अपेक्षा असतात ज्या पूर्ण करण्याची क्षमता या अधिकाऱ्यांमध्ये असते.
संघ लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच घोषित झालेल्या निकालानुसार ऋषिकेश विजय ठाकरे यांचा 224 वा क्रमांक तर क्षितिज संजय गुरभेले यांचा 441 वा क्रमांक आल्याबद्दल त्यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ऋषिकेश ठाकरे म्हणाले की स्पर्धा परीक्षेमध्ये धडपड करत असताना कुठेतरी धोका पत्करावा लागतो आणि सातत्याने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे ,तरच यश मिळू शकते. क्षितिज संजय गुरभेले यांनी आपला विचार व्यक्त करताना म्हटले की स्वयंअभ्यास फार महत्त्वाचा आहे मात्र या सोबतच सर्व विद्यार्थ्यांनी एक लक्ष्य ठेवतानाच योजना ब क सुद्धा सोबत असू द्यावी म्हणजे जीवनात नैराश्य येत नाही ,तर काही ना काही नक्कीच हाती लागते. सोहळ्याचे संचालन कार्यकारिणीचे सदस्य प्रा.
डॉ. मोहन खडसे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव अनुराग मिश्र यांनी केले. या सोहळ्याला शेगाव येथील प्रशासकीय अधिकारी श्रीमती बोरकर मॅडम दोनही यशस्वी अधिकाऱ्यांचे आई-वडील ,नातेवाईक ,कर्मचारी आणि मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. या अभिनंदन सोहळ्याच्या आयोजनासाठी ग्रंथपाल सतीश डगवाले , सुरेश टेके , जुगलकिशोर शिरसाट, नितीन कदम, स्वप्निल ताथोड, सुनील मिश्रा यांनी परिश्रम घेतले.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा