*वेताळबांबर्डे केंद्रात शाळापूर्वतयारी मेळावा आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न*
कुडाळ
शुक्रवार दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वेताळ बांबर्डे नं . १ येथे केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी मेळावा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला . सदर मेळाव्यासाठी वेताळ बांबर्डे केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख मा श्री तळेकर सर । गटसाधन केंद्र कुडाळ चे साधन व्यक्ती श्री जालंदर जाधव सर केंद्रमुख्याध्यापक श्री गोसावी सर केंद्रातील सर्व शाळांचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक , पदवीधर शिक्षक उपशिक्षक अंगणवाडी सेविका ताई , इयत्ता पहिलीत दाखलपात्र विद्यार्थी व माता पालक , काही शाळांच्या लीडर माता ,व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपस्थित होते .
श्री सरस्वती देवीच्या सुस्वर अशा प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली . पहिल्या सत्रात केंदशाळा वेताळ बांबर्डेच्या उपशिक्षिका सौ. सावली सुर्वे मॅडम व पावशी मिटक्याचीवाडी शाळेच्या उपशिक्षिका सौ . आदिती मसुरकर मॅडम यांनी शाळापूर्व तयारी मेळाव्या संदर्भात मुख्याध्यापक शिक्षक वअंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण दिले. यामध्ये त्यांनी मेळाव्याची सुरुवात , मेळाव्याचे स्वरूप , संपूर्ण महाराष्ट्रात होणारी कार्यवाही , मेळाव्याची गरज व त्यातून विद्यार्थ्यांचा झालेला फायदा इत्यादी विषयक माहिती दिली.
केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख मा . श्री तळेकर सरांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत दिले जाणारे दर्जेदार शिक्षण व इयत्ता पहिलीचा विद्यार्थी व त्याचा पाया किती महत्त्वाचा आहे. यादृष्टीने उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. व साधनव्यक्ती श्री जाधव सर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत दर्जेदार शिक्षण मिळतं हे मोफत शिक्षण मुलांना देताना त्या मुलाचे पालक या नात्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दरमहा शिक्षणासाठी पैसे बचत करा. पुढे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ते पैसे खर्च करा. हे बहुमोल असे आपले विचार मांडले.
गडकरी अंगणवाडी सेविका सौ पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले . लीडर मातांनी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळांविषयी कौतुकाचे उद् गार काढत आपले अनुभव कथन केले .
अल्पोपहारानंतर दुसऱ्या सत्रात प्रत्यक्ष मेळाव्याला सुरुवात झाली . ढोल पथक व घोषणा देत इयत्ता पहिलीत दाखलपात्र विद्यार्थी व माता पालकांसह प्रभात फेरी काढण्यात आली .विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्या डोक्यावर त्यांचे नाव लिहिलेली आकर्षक टोपी घालण्यात आली. तसेच या मुलांना गुलाब पुष्प भेटवस्तू व गोड खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले . सेल्फी पॉईंटवर या मुलांसोबत सेल्फी घेण्यात आला . या स्वागतामुळेच हे सर्व सत्कारमूर्ती बाळगोपाळ व त्यांच्या माता पालकांचे चेहरे आनंदाने फुलले.
मेळाव्यात रांगेने आकर्षक पद्धतीने रांगोळ्यांनी सजवून ७ टेबलांची रचना केली होती . या प्रत्येक टेबलावर शिक्षक व अंगणवाडी ताईंकडून या छोट्या दोस्तांची वजन उंची करून त्यांचा शारीरिक , भावनिक , मानसिक , बौद्धीक , भाषिक व गणनपूर्व तयारी इत्यादी संदर्भातील विकास , प्रगती यांची चाचपणी करण्यात आली. सातव्या टेबलवर अनुभव संपन्न अशा उच्च श्रेणी मुख्याध्यापकांद्वारे माता पालकांचे विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार समुपदेशन करण्यात आले.
या मेळाव्या दरम्यान गटसाधन केंद्र कुडाळ च्या साधनव्यक्ती मा सौ. पाताडे मॅडम यांनी या केंद्रबल गटाला भेट दिली . मेळाव्या संदर्भात आढावा घेतला . व उपस्थित सर्व माता पालकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले . या माता पालकांनीही आपले विचार मांडले .
सर्वात शेवटी केंद्रशाळा वेताळ बांबर्डेचे पदवीधर शिक्षक श्री ठाकूर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले .
अशाप्रकारे जल्लोषात हा मेळावा संपत्न झाला.
*संवाद मीडिया*
🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬
*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर चौथा प्रोजेक्ट…*
*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*मालवण*
https://sanwadmedia.com/133216/
https://sanwadmedia.com/131942/
*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*
*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..
*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*
*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*
*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*
*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*🔹बुकिंग संपर्क 🔹*
*👉रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*
*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*
*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*
*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*
*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*