*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*
*रामनवमी*
*(मर्यादापुरुषोत्तम राम)*
” *सत्वगुणी होणे सात्विका कारणे ।*
*कोपे संहारणे दुर्जनासी ।।*
*दुर्जना संहार सज्जना आधार ।*
*भाविकास पार पाविजे तो ।।*
*म्हणुनी रामदास म्हणतात,*
*रघुनायका सारिखा देव नाही ।।*
*क्रिया पाहता चोखटी सर्वकाही।।*
*समर्थ रामदास*
हिंदू संस्कृती ही अध्यात्म , विवेकबुद्धि , सहिष्णुता , त्याग , पराक्रम , मानवता यावर अधिष्ठित आहे. हा प्राचीन इतिहास आहे.
सृष्टिचा *सत्यंशिवंसुंदरम* असा हा विलोभनिय दृष्टांत असून अंधाराला प्रकाशमान करणारी , संतत्वातुन अनंताकडे ,भेदातुन अभेदाकडे घेवून जाणारी आणि मानवी कल्याणकारी मुलतत्वांची जाणीव करून देणारी निःसीम , निर्मळ परस्पर प्रेमभावना जागृत करणारी अशी *अद्वितीय संस्कृती* आहे आणि ती सर्व जगात श्रेष्ठ आहे.
मूलतः हिंदू धर्मामध्ये सर्वत्र अनंत कालापासून अत्यंत श्रद्धेने धार्मिक सण उत्साहाने साजरे केले जातात. प्रत्येक सणाला खुप महत्व , परंपरा आहेत. खरं तर हा विषय खुपच मोठा आणि अभ्यासाचा आहे.
या भूतलावर देवाधिदेवांचा जन्म झाला. देव भूतलावर नांदत होते रहात होते त्याच्या आख्यायिका आजही आपण ऐकतो आहोत.
या सर्व आख्यायिका ,कथा , गोष्टी ऐकताना प्राचीन इतिहासामध्ये अनेक उलथापालथी , स्थित्यन्तरे झाल्याचे आपल्या लक्षात येते.
*सुख , समृध्दी , ऐश्वर्य , स्वर्गसुख या साऱ्या आनंद प्राप्तीच्या गोष्टी आहेत.* तरी प्राक्तन , प्रारब्धभोग , कर्म , संचित , दुःख , वियोग , पाप , पुण्य अशा गोष्टी जीवनातअनिवार्य असतात याची प्रचिती आपल्याला नित्य येत असते.
पण वास्तवतेत ज्यावेळी या भूतलावर ( पृथ्वीवर ) असत्य , अधर्म , अन्याय , अशाप्रकारची संकटे , विघ्ने आली तेंव्हा तेंव्हा प्रत्यक्ष भगवंताने अवतार धारण करून प्रत्येक जीवाचे रक्षण केले आहे हे आपल्याला ज्ञात होते. म्हणूनच *भगवंताचे दशअवतार* मानले जातात. म्हणूनच श्रीविष्णुचा *सातवा अवतार श्रीराम आहे असे समजले जाते*.मानवी जीवनामध्ये रामनाम जपाला अत्यन्त महत्व आहे.
*रामनाम घेतल्याने , मानवाला मोक्षमुक्ती मिळते असे म्हणतात.*
ही श्रद्धा आहे.
*चैत्रशुद्ध नवमिला पुनर्वसु नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर अयोध्या येथे राजा दशरथ व कौसल्याराणी यांच्या पोटी प्रभुरामचंद्र यांचा जन्म झाला*
*रामराज्य , एकवचनी राम , एकपत्नी राम अशा कित्येक बिरुदांनी पूण्यपावन असलेले हे रामनाम* म्हणजे एक *पुण्यशील भारतीय संस्कृती आहे* हे सर्वश्रुत आहे.
प्रभुरामचंद्र यांच्या जीवनावर महर्षि वाल्मिकी ऋषींनी *रामायण या महाकाव्याची अत्यंत प्रासादिक अशी रचना निर्माण केली असून ती हिंदूधर्म , हिन्दुसंस्कृतीला शिरोधार्य आहे.*
*सृष्टितील सर्व नात्यांच्या मूलभूत भावनांचे अत्यंत हृद्य असे असे वर्णन या रामायण ग्रंथातुंन आपल्यास प्रत्ययास येते.*
प्रभुश्रीराम यांचे आख्यान ऐकताना किंवा रामायण ग्रंथ आपण वाचताना जेंव्हा आत्ममुख होतो तेंव्हा *एका संस्कारित आदर्श जीवनाची प्रचिती येते*
लहानपणी गोराराम मंदिर सातारा येथे मी प्रत्येक उत्सवात सहभागी होत असे. तो काळ ,त्या मंदिर परिसरातील प्रत्येक व्यक्ती आजही माझ्या डोळ्यात आहे. त्या अत्यन्त कौटुंबिक , जिव्हाळ्याच्या सहवासाची आजही आठवण आहे. *आजही या वयात आम्ही काही मित्रमैत्रिणी जेंव्हा भेटतो तेंव्हा आम्ही खुपच समृद्ध जीवन जगलो आहेत याची जाणीव होते.*
त्या संस्कारक्षम वातावरणात त्या मला अनेक दिग्गज असे महामहोपाध्याय , कीर्तनकार , प्रवचनकार , व्याख्याते यांच्याकडून सर्वच धर्मग्रंथ ऐकण्याचे , विष्णुपुराण , भागवत सप्ताह , भगवतगीता , ज्ञानेश्वरी इत्यादि ग्रंथ श्रवण करता आले हे मी माझे पूर्वकर्म , सौभाग्य समजतो. त्या साऱ्या आठवणी आजही काळजात आहेत.
*जगातील प्रत्येक देशात भारतीय संस्कृती , भारतीय ग्रंथसंपदा आदर्श वाटते हे आजचे वास्तव आहे.*
आपल्या कुटुंबातील मुलांना आपल्या धर्माची , आपल्या भारतीय संस्कृतिची ओळख करून देणे हे आपले निजी कर्तव्य आहे असे मला वाटते.
आजकाल सर्वत्र आपल्याकडे सर्वच सण अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात हे खरे पण या उत्सवांचे मूलभूत संस्कारसंस्कृतिची जाणीव आपण पुढच्या पिढीला करून देणेही गरजेचे आहे.
*प्रभुरामचंद्र म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व*
प्रभुराम एक आदर्श आज्ञाधारक सुपुत्र होता. त्याने सदैव आपल्या आइवडिलांच्या आज्ञेचे पालन केले . आपल्या सर्वच ऋणानुबंधी नात्यांचे नेहमी निर्मोही वृत्तिने पालन केले. कर्तव्यपरायण असे राजधर्माचे देखिल अत्यंत प्रामाणिक पणाने पालन केले. नैतिकतेची जाणीव ठेवून प्रजेचे देखील निस्वार्थी पणाने निरपेक्ष पालन केले.
म्हणूनच त्याचा कार्यकालाधी हा *रामराज्य* ओळखला जातो.
म्हणूनच प्रत्येक जनसामान्याला *रामराज्य पुन्हा यावे असे वाटते*
आपण सर्वांनी नेहमीच *चैत्रशुध्द नवमी (रामनवनी )* प्रभुरामचंद्रांचा आदर्श आपल्या जीवनात रुजवत सदैव साजरी करावी..
*इती लेखनसीमा*…………….
*वि.ग.सातपुते.( पुणे )*
*संस्थापक अध्यक्ष:-*
*महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे*
*📞 ( 9766544908 )*
*संवाद मीडिया*
*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣
*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹
*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️
*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/
*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️
*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡
*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*
*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*
*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*
*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*