मॉरिशसमधील कलावंतांचा सिंधुदुर्गात मराठी कलाविष्कार.!
कोमसाप सिंधुदुर्ग टीमच्या वतीने जल्लोषी स्वागत.
सावंतवाडी : ‘
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..! अन् श्री गणरायाचे नमन करत मॉरिशसमधील तब्बल २३ मराठी कलाकारांनी उपस्थित मान्यवरांची अक्षरशः मने जिंकली. जवळपास आठ ते नऊ नृत्य, नाट्यछटा अशा विविध कला सादर करत मराठी भाषेचा जयजयकार मॉरिशसमध्येही कसा घुमतो आहे?, याची प्रचिती कसाल येथील श्रीदेवी पावणाई रवळनाथ मंदिरातील सभागृहमध्ये मॉरिशस मधील मराठी बांधवांनी दाखवून दिली.
आम्ही तब्बल २०० वर्षांपूर्वी या भागातून म्हणजेच महाराष्ट्र, कोकण आणि भारतातील विविध प्रांतातून आमचे पूर्वज मॉरिशसमध्ये गेले खरे पण आज आम्ही आमच्या मायभूमीतील मातीत येऊन आम्हाला तुमच्यासोबत रमता आले हे खरंच आमचं भाग्य आहे. यानिमित्ताने कोकण व सिंधुदुर्ग आणि मॉरिशस यांच्यातील संबंध आणि नाते अधिक दृढ होण्यास चालना मिळाली आहे. अशा प्रांजळ भावना मॉरिशस येथील कलावंतांनी येथे व्यक्त केल्या. कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्गच्या वतीने कसाल येथे मॉरिशस देशातील मराठी प्रेमी बांधवांचा कलाविष्कार कार्यक्रम संपन्न झाला.
मॉरिशसमधील मराठी बांधवांचा कलाविष्काराने सर्वांची मने जिंकून घेतली. “पुन्हा पुन्हा या मातीत आणि या कोकणात आम्हाला यावेसे वाटेल, आमचा अत्यंत भावनिक आदरतिथ्य आणि प्रेमभावना आम्हाला कोकण मराठी साहित्य परिषद व कसालवासियांनी दिल्या आहेत. हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही, तुम्ही सर्वजण मॉरिशसला नक्कीच या..!’ असे निमंत्रणही यावेळी या मॉरिशसच्या बांधवांनी दिले.
कसाल येथे मॉरिशस येथील कलाकारांचा कलाविष्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने या मॉरिशसमधील मराठी बांधवांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या हस्ते मॉरिशस मराठी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन अर्जुन पुतलाजी व मॉरिशस मराठी स्पिकिंग युनिटचे अध्यक्ष नितीन बापू, जनरल सेक्रेटरी जागतिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक मंच भारत दिलीप ठाणेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, प्रांत प्रतिनिधी व ज्येष्ठ लेखिका उषा परब, स्वागत समितीचे अध्यक्ष रुजारियो पिंटो, कुडाळ तालुकाध्यक्ष सौ. वृंदा कांबळी, सावंतवाडी तालुका अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, ॲड. नकुल पार्सेकर, चिराग बांदेकर, संदीप वालावलकर सचिन वालावलकर, देवस्थान समितीचे यशवंत परब राजन परब, अमेय परब, विनोद परब, उत्तम कदम, शंकर परब, रमाकांत लिंगायत, श्री . गुरव आदि उपस्थित होते.
यावेळी मॉरिशसमधील कलावंतांनी मराठी भाषेचा कलाविष्कार आणि मॉरिशसमधील कला सादर केल्या. भारताच्या दौऱ्यावर मॉरिशसमधील टीम १४ एप्रिलला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मॉरिशसमधील टीमचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसाल व मालवण येथे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी महाराष्ट्रातील पहिला प्रयोग कलाविष्काराचा कसाल येथे सादर करण्यात आला. यावेळी मॉरिशसमधील बांधवांनी आपल्या कला सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. सर्वप्रथम मराठी भाषेत संभाषण करत “आम्ही आमच्या पूर्वजांच्या भागात आलो आहोत, आमच्या पूर्वजनांचा शोध आम्हाला लागला आहे. आम्ही याच मातीतील असून आम्हाला २०० वर्षानंतर पुन्हा आमच्या सुगंध अनुभवायला मिळाला. खऱ्या अर्थाने या कसाल गावामध्ये आमचे काहीतरी वेगळे नाते आहे याचा आम्हाला भास होतो आहे”, अशा शब्दात मॉरिशसचे मराठी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन अर्जुन पुतलाजी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान यावेळी कसाल येथील देवस्थान समितीच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मसके म्हणाले, मॉरिशस आणि भारत देशाचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने मॉरिशसमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या मॉरिशसच्या बांधवांसोबत आमचं एक सांस्कृतिक, साहित्यिक नाते निर्माण झाले आहे. आज ते आपल्या कोकणात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या आजोळी आले आहेत. आपल्या मूळ देशाचा आणि मराठी भाषेचा ते जयजयकार मॉरिशसमध्ये करत आहेत. खरोखर ही बाब कौतुकास्पद आहे.
यावेळी ज्येष्ठ लेखिका उषा परब यांनीही आपले विचार मांडले. यावेळी मॉरिशस मराठी स्पीकिंग ट्रस्टचे अध्यक्ष नितीन बापू व जनरल सेक्रेटरी दिलीप ठाणेकर यांनी मॉरिशसमध्ये मराठी भाषासाठी कसे उपक्रम राबवले जातात याची माहिती दिली.
यावेळी सर्वप्रथम गणरायाच्या गीताने कलाविष्काराला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा.!’ या गीताने तर अक्षरशः उपस्थितांची मने मॉरिशसच्या टीमने जिंकली तर त्यानंतर विविध नृत्य कला सादर करत कसालवासीयांना अक्षरशा मराठीचा जागर कऱण्यात आला. या कार्यक्रमाचा शेवट मॉरिशसमधील प्रसिद्ध नृत्याने करण्यात आला. यावेळी कौशिक हरी, सन्वी सीताराम, प्रियांका सीताराम, प्रीतीबाई, रघुश्रेष्ठ रुगजी, रत्नाबाई, लक्ष्मण विमलाबाई रूमजी, ऋषी देवजी चव्हाणराव, अंबाजी जयश्री बापू, हेमा क्रांती, पुतलाजी आधी जवळपास २५ जणांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन जिल्हा खजिनदार भरत गावडे यांनी केले. प्रास्ताविक कुडाळ तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष वृंदा कांबळी तर आभार सचिन वालावलकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
*👉पाहिजेत…पाहिजेत…पाहिजेत….!*🏃♀️🏃
👚👖👕👖👔👖🎽👖👚👖👕👖👚
*Cottonking व TYZER शोरूममध्ये कामासाठी होतकरू मुलं पाहिजेत !🏃♀️🏃*
*नोकरीची सुवर्णसंधी, स्थानिकांना प्राधान्य!*👨⚖
*💸आकर्षक पगार*
*📍पत्ता : कॉटनकिंग व टायझर शोरूम, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव जवळ, सावंतवाडी*
*संपर्क : 📲9881234047*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131989/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*