*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*
अध्याय सतरावा
*श्री गजानन विजय ग्रंथ*
अग्निरथ प्रवासाची
कथा समर्थांची खास
सतराव्या अध्यायात
श्रोते बसा श्रवणास ||
चला मलकापुरास
भक्त विष्णुदासा घरी
वदे भास्कर समर्था
आता निघावे सत्वरी ||
समर्थांना आणण्याचा
शब्द विष्णुदासा दिला
इच्छा पूर्ण करावी हो
स्टेशनास आता चला ||
केला श्रींसाठी रिकामा
डबा हा लोकांचा बारा
शांत ‘श्री’ घंटा होताच
केला त्यांनी हो पोबारा ||
नग्न शिरले गाडीत
बायकांच्या या डब्यात
वर्दी पोलीसांना दिली
आला पोलीस धांवत ||
खाली ओढले समर्था
परि हलले न संत
स्टेशनमास्तर आले
बहु वाटे त्यांस खंत ||
संत हा ईश साक्षात
वदे जाऊ द्यावे यांस
वरिष्ठांना वर्दी सांगे
अधिकारी मास्तरास ||
न्यायालयी हा खटला
गर्दी जमे ऐकण्यास
महाराज जीवमुक्त
चुके भक्त कर्तव्यास ||
होते भास्कराचे काम
नीट ठेवण्याचे श्रीं”स
केले ते न त्यांनी ठीक
पात्र भास्कर दंडास ||
कुरूमचा महेताब
समर्थांना भेटण्यास
शेगांवास आला होता
दिला सन्मान हो त्यांस ||
नाही गेले हो समर्थ
एकटेच भोजनास
सोबतीस महेताब
देई प्रेम विधर्म्यास ||
सदा पाळावा सर्वांनी
सर्वधर्म समभाव
मिळे हीच शिकवण
मनी ठेवा प्रेमभाव ||
©️®️
सौ.मंजिरीअनसिगकर,
नागपूर.
*संवाद मीडिया*
*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣
*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹
*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️
*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/
*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️
*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡
*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*
*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*
*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*
*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*