दोडामार्ग
दिवंगत मंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मतिथीचे औचित्य साधून कोरोनाच्या काळात झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण मित्रमंडळ व दोडामार्ग भाजपच्यावतीने आज पिंपळेश्वर सभागृह दोडामार्ग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणत पन्नास जणांनी रक्तदान करत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला काही वर्षांपूर्वी जिल्हात लेप्टोची साथ आली होती आणि राज्यातील रक्ताचा पुरवठा संपत आला होता.त्यावेळी जिल्हा चिकित्साने विनंती केली होती की काळसेकर तुमचा पण ब्लड कॅम्प झाला नाही आणि तुमचा एक कॅम्प करायला पाहीजे आणि एका काँलवर एका दिवसात आयोजन करुन जास्तीत जास्त ब्लड डोनेट दोडामार्ग तालुक्यातुन झालं होत आणि यांच श्रेय चेतन चव्हाण व प्रविण गवस यांना दिलं जातं असे गौरउद्धार आयोजित रक्तदान शिबीरादरम्यान बोलताना अतुल काळसेकर यांनी सांगितले.यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ माजी शिक्षण सभापती अनिशा दळवी माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण पंचायत समिती सदस्य बाळा नाईक,भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, शहराध्यक्ष पांडुरंग बोर्डेकर डॉ.एम. ए.बागवान विठोबा पालयेकर पराशर सावंत दीपक गवस प्रा.संजय खडपकर प्रा.दरेकर सूर्यकांत गवस देवेंद्र शेटकर समीर रेडकर राजेश पुलारी सुनील गवस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.