*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार, निवेदिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शिल्पकार*
डाॅ.बाबासाहेब
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
माणूस म्हणून जगण्याचा
मिळाला आम्हासं अधिकार
शिका आणि संघटित व्हा !
दिला हा संदेश
त्यांचे करतो पालन
भारत आपला देश
चवदार तळ्याचे पाणी
केले तुम्ही खुले
दिनदलितांचे आनंदाने
भरुन आले डोळे
भीमराया तुम्ही
गोर..गरीबांचे कैवारी
तुमच्या तेजस्वी विचारांनी
घेऊ उत्तुंग भरारी
स्वातंत्र्य, समता, बंधूभाव
रुजविला प्रत्येकाच्या मनात
आपले सुंदर विचार
पोहचले ह्रदया ह्रदयात
जागविला आमच्यात
तुम्ही स्वाभिमान
भारत देश
आपला महान
वाचाल तर वाचाल
हे ठेवलं आम्ही ध्यानी
भीमराया तुम्ही
होते फार गुणी
संविधानात तुमचा
सिंहाचा वाटा
मिळाला आम्हासं
ज्ञानाचा साठा
शिक्षण हे वाघीणीच दूध
केलं प्राशन आम्ही
म्हणूनी घरा..घरात
ज्ञानाची पहाट…
ज्ञानाचा अथांग सूर्य
आजही तेवढाच तेजस्वी
शब्द सुमनांनी
गाते तुमची महती
भीमराया तुम्हाला
कोटी कोटी प्रणाम
आज दाही दिशा
आपलेच नाम
कवयित्री
अनुपमा जाधव