You are currently viewing श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

 

*श्री गजानन विजय ग्रंथ*

अध्याय पंधरावा

 

पहा‌ पंधरा अध्यायी

गाथा ही देशभक्तीची

राष्ट्र प्रेमी राष्ट्रभक्त

लोकमान्य टिळकांची ||

 

शिवजयंतीची एक

सभा अकोली ग्रामासी

व्याख्यानाचे निमंत्रण

दिले होते टिळकांसी ||

 

संत रामदास कृपा

लाभे शिष्य शिवबाला

शेगा‌वीचे ‌”श्री” ही आले

द्याया आशिष” बाळाला” ||

 

टिळकांसी ऐकावया

लोकं जमले अपार

समर्थांना पहाण्याची

उत्सुकता होती फार ||

 

सूर्य स्वातंत्र्याचा आज

मावळला देशावर

सांगे टिळक सभेत

दास्यत्वाचा अंधकार ||

 

राष्ट्रप्रेम वाढे ऐसे

द्याल का आम्हा शिक्षण

बोले सत्य भूपतीस

देशभक्ती शिकवण ||

 

दोन्ही दंडात काढण्या

अशानेच पडतात

समर्थांचे हे भाकीत

बेड्या पडल्या हातात ||

 

उपायांची पराकाष्ठा

केली भक्त मंडळींनी

भाकरीचा प्रसाद हा

दिला”बाळासाठी” श्रींनी ||

 

शिक्षा तुरूंगवासाची

मंडाल्यांत नेले त्यांना

जन्मे गीतारहस्य हो

कीर्ती मिळे टिळकांना ||

 

गीता अर्थ कर्मपर

लावी बाळ गंगाधर

टिळकांची कामगिरी

अनमोल आहे फार ||

 

विस्कळीत समाजाची

नीट घडी ही बसवी

मोक्षपदा नेई गीता

तत्वज्ञान समजवी ||

 

©️®️ सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा