*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम लावणी*
*घमघमला मोगरा*
————————————————
उतरून आली उन्हे, थोडे काम बाजूला करा
अंगणामध्ये पहा केव्हढा, घमघमला मोगरा
हिरव्या हिरव्या पानांमधुनी
शुभ्र फुले ही झगमगती
आकाशीच्या जणू तारका
भूलोकांवर अवतरती
संध्यासमयी त्यांच्या संगे रंग प्रीतीचे भरा
अंगणामध्ये पहा केव्हढा घमघमला मोगरा
अवखळ वारा ये जा करतो
गंध फुलांचा मनात भरतो
तुम्हा सवे क्षण भाग्याचा
त्या गंधाला हाती धरतो
चांद उगवण्या उशीर आहे थोडा धीर धरा
अंगणामध्ये पहा केव्हढा घमघमला मोगरा
कसे तुम्हा मी सांगू आता
तुमच्या संगे बोलू वाटे
पहा जरा ना इथे तिथे
गुलाबासवे झुलती काटे
समीप येऊन बसा राजसा, काट्याना दूर करा
अंगणामध्ये पहा केव्हढा घमघमला मोगरा
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@सर्व हक्क सुरक्षित