सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा आज वाढदिवस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना बळकट होतीच परंतु मागील पाच वर्षात सत्तेत असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणावा तसा विकास झाला नाही. केसरकर यांनी पालकमंत्री असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी आणला परंतु सरकारी अधिकारी वर्गावर अंकुश न ठेवल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आणि तेव्हाच केसरकर यांच्याबाबत स्वकीयांमध्ये आणि जिल्हावासीयांमध्ये नाराजी पसरली. केसरकर यांच्या मवाळ भूमिकेमुळे विरोधी पक्ष जिल्ह्यात वाढू लागला आणि त्याचा फटका शिवसेनेला बसायला लागल्याने मूळ सिंधुदुर्ग वासीय असलेले रत्नागिरी येथील शिवसेनेचे दबंग नेते उदय सामंत यांच्यावर पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून धुरा सोपविली.
उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामांना सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात शिवसेना पक्षाला उर्जितावस्था आणण्यासाठी सेनेच्या नेत्यांमध्ये ताकद निर्माण करण्यासाठी एका जहाल नेतृत्वाची गरज होती आणि तिच गरज पूर्ण करण्याचे काम रत्नागिरी मधून प्रचंड मतांनी निवडून आलेले शिवसेनेचे तरुण नेतृत्व उदय सामंत यांनी पूर्ण केली. सेनेच्या तळागाळातील नेत्यांना कार्यकर्त्यांना मानसिक पाठबळ देत उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली, त्यामुळे गावागावात शिवसेनेचे कार्य जोमाने सुरू झाले.
शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जागृत करून नवे बळ देणारे तरुण तडफदार पालकमंत्री उदय सामंत यांचा आज वाढदिवस. संवाद मिडियाकडून पालकमंत्री उदय सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐