You are currently viewing श्री गजानन विजय ग्रंथ* अध्याय तेरावा

श्री गजानन विजय ग्रंथ* अध्याय तेरावा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

*श्री गजानन विजय ग्रंथ*
अध्याय तेरावा

नाव गंगाभारती हो
वसे सवडद ग्रामी
कुष्ठ रोगाने त्रासला
असे दु:खी अंतर्यामी ||

शेगांवला श्रीचरणी
रहाण्यास असे आला
स्पर्शजन्य रोग फार
भेटण्यास नाकारला ||

जना डोळा चुकवून
लोळलासे श्रीचरणी
श्रींनी फोडले थोबाड
लाथ मारिली थुंकुनी ||

पडे बेडका शरीरी
तोची प्रसाद मानला
भासे सुगंधी मलम
पूर्ण शरीरी चोळला ||

गंगाभारतीस होती
कला गायन विज्ञात
रागदारी भिन्न भिन्न
गात असे सुस्वरांत ||

करी स्वामींपुढे नित्य
दूर बैसोनी भजन
होई प्रसन्न “श्री”मन
सर्वा आवडी गायन ||

व्याधी गंगाभारतीची
झाली नष्ट श्रीकृपेने
आप्तजन विनवती
चला घरी आनंदाने ||

वदे गंगाभारती हो
खीर ही परमार्थाची
नका टाकू मोहमाती
नुरे धुंदी संसाराची ||

कृपा समर्थांची होता
उपरती होई चित्ता
चुके चौ-यांशीचा फेरा
नरजन्म सार्थकता ||

©️®️.
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा