You are currently viewing शंभू राजांच्या बलिदान दिवस कार्यक्रमात गोव्याचे सुपुत्र अँड शिवाजी देसाई यांना मिळाला अग्र महा पूजेचा मान

शंभू राजांच्या बलिदान दिवस कार्यक्रमात गोव्याचे सुपुत्र अँड शिवाजी देसाई यांना मिळाला अग्र महा पूजेचा मान

शंभू राजांच्या बलिदान दिवस कार्यक्रमात गोव्याचे सुपुत्र अँड शिवाजी देसाई यांना मिळाला अग्र महा पूजेचा मान

सावंतवाडी

आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून तसेच वक्तृत्वातून गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे गोव्याचे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते तसेच गोवा सत्तरी तालुक्यातील ब्रह्मा करमळी या गावचे राहिवासी, तसेच ज्यांच्या आईचे गाव महाराष्ट्र राज्यातील सावंतवाडी तालुक्यातील खळणे वाडी सांगेली ह्या गावातील सावंत भोसले घराण्यातील आहे असे अँड शिवाजी यशवंतराव देसाई यांना महाराष्ट्र राज्यातील वढू बुद्रुक , तुळापूर येथे झालेल्या संभाजी राजांच्या बलिदान दिवस कार्यक्रमात संभाजी राजांच्या तसेच कवी कलशांच्या समाधीच्या , तसेच पुतळ्याच्या अग्र महापूजेचा मान सपत्नीक भारतातून आलेल्या हजारो शंभू राजे आणि छत्रपती शिवाजी राजे यांच्या भक्तगणांच्या उपस्थितीत प्राप्त झाल्याने संपूर्ण गोव्यासाठी तसेच सावंतवाडी तालुक्यासाठी ही अत्यंत भूषणवाह गोष्ट ठरली आहे. संपूर्ण गोव्यामध्ये अशा प्रकारचा अत्यंत मोठा आणि दुर्मिळ मान प्राप्त होणारे अँड शिवाजी देसाई हे गोव्यातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.ही महापूजा महाराष्ट्रातील वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधी ठिकाणी मंत्र उच्चारांच्या माध्यमातून ब्रम्ह वृंदानी संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी सोमवार ८ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता संपन्न झाली. यावेळी भारताच्या काना कोपऱ्यातून हजारो शंभू आणि शिव भक्त उपस्थित होते.या कार्यक्रमात नंतर शासकीय पूजा संपंन होऊन शंभू राजांना शासकीय मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमात शिवाजी महारांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले, अभिनेते आणि वक्ते राहुल सोलापूरकर, खासदार डॉ.अमोल कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील, डॉ.संदीप महिंद, विविध शासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी शंभू राजांच्या समाधीवर पुष्प वृष्टी हेलिकॉप्टर मधून करण्यात आली. यावेळी हजारो शिवशंभूभक्तांनी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲड शिवाजी देसाई म्हणाले माझ्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे. आजही मलाही संधी मिळाली या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. परंतु ही संधी मला माझ्या कर्मामुळे ईश्वरी आशीर्वादामुळे, माझ्या आई-वडिलांच्या कृपेमुळे तसेच शिवशंभूमुळे प्राप्त झाली. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला मिळालेली संधी ही माझ्या संपूर्ण गोव्याच्या जनतेला प्राप्त झालेला मान आहे. याविषयी सर्व स्तरातून अँड शिवाजी देसाई यांचे कौतुक होत असून मान्यवरांनी याविषयी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

१. अँड शिवाजी देसाई यांची आई ही सावंतवाडी तालुक्यातील सांगेली खळणेवाडी येथील सावंत भोसले घराण्यातील आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाचा सन्मान खूप वाढला आहे. ही संपूर्ण सावंतवाडी तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. यामुळे आमचे भोसले घराण्याची शान उंचावली आहे. अँड शिवाजी देसाई यांचा आम्हा खळणेवाडी ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे.

श्री घनश्याम सावंत भोसले
खळणेवाडी, सांगेली
तालुका सावंतवाडी

2. अँड शिवाजी देसाई यांना त्यांच्या कर्तृतमुळे अनेक पुरस्कार हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त झाले आहेत. तसेच शंभू राजांच्या बलिदान दिनी त्यांच्या समाधीच्या अग्र महापूजेचा मान त्यांना मिळणे म्हणजेच सावंतवाडी तालुक्यासाठी गौरवास्पद आहे. सावंतवाडी तालुक्यातील जनतेने त्यांच्या कार्याची आणि कर्तृत्वची दखल घ्यायला हवी. त्यांचा जन्म सावंतवाडीत झालेला आहे. हे आम्हा सर्वांसाठी भूषण वाह आहे. मी त्यांचा मामा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

श्री सुहास सावंत भोसले
खळलेवाडी, सांगेली
तालुका सावंतवाडी

२.छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू येथील समाधीस्थळी महाराजांच्या बलिदानी आपणास मिळालेले स्थान हे तमाम गोमंतकीयांना प्रेरणादायी आहे. महाराजांचे बलिदान आणि धर्म रक्षणार्थ झालेले हाल हाल वेदनादायी होते. तरीही या राष्ट्र पुरुषाने आपली आहुती दिली मात्र शरणागती पत्करली नाही. या पवित्र आत्म्यास त्या स्थळी जाऊन केलेली प्रार्थना यासारखे भाग्य नाही असे मी मानतो. आपणास निमंत्रीत करून दिलेले हे स्थान आपल्या पुर्व पुण्याईचे फळ आहे. महाराजा सारखे धर्म रक्षणाचे पाईक आज दुर्मिळ आहे. आपण खूप भाग्यवान ठरलात. तुमच्या निर्भिड कार्यास शुभेच्छा!
श्री राजमोहन शेटये , सामाजिक कार्यकर्ते पेडणे गोवा

 

फोटो: महाराष्ट्रातील वढू बुद्रुक येथे सभाजी राजांच्या समाधीची अग्र महापूजा करताना अँड शिवाजी देसाई आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रियदर्शिनी देसाई

प्रतिक्रिया व्यक्त करा