*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि.देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हे स्वामी समर्था अवधूता ।।*
————————————————–
डोळे मिटुनी स्मरण करता
दत्तगुरूंच्या रुपात दिसता
हे स्वामी समर्था अवधूता ।।
त्रिगुणात्मक रूप पाहुनी
मनासी अति आनंद होतो
हात जुळती प्रणामा करिता
हे स्वामी समर्था अवधूता ।।
भक्तवत्सल खरेच तुम्ही
सदैव असता आमच्या पाठी
आधार तुम्हीच आमचा आता
हे स्वामी समर्था अवधूता ।।
दत्तगुरूंच्या रुपात दिसता
हे स्वामी समर्था अवधूता
काव्यपुष्प करी कवीअरुणदास
होई परम आनंद माझ्या चित्ता ।।
——————————————–
कविता – हे स्वामी समर्था अवधूता ।।
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
——————————————————————————