*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार, निवेदिका अनुपमा जाधव लिखित अहिराणी बोलीभाषेतील अप्रतिम कविता*
*निसर्गनी शाया*
निसर्गनी वाया भरुनी
निसर्गनी वाया
आठे नहीं मास्तर बाई
आठे नही फया
हिरव्या हिरव्या शायमा
समदं हिरवंगार
आठे नही पुस्तक पाटी
आठे नही मार
आठे फुलेफुलेसना
बहरेल झाडे शेतस
फांद्यां फांद्यासवर गानारा
पक्षी सुंदर येतस
हत्तीदादा व्यायामनी
आठे वाया लेस
संकटंमातून कसं तरानं
यानं शिक्षण देस
जिराफ सांगस जखमा या
ताठ मान करी जगा
घोडा सांगत शक्ती कशी
कमाडानी ते शिका
झाड शिकाडस
सावली दे
फूल शिकाडस
सुगंध दे
अनुपमा जाधव