आमदार नितेश राणे यांची स्पष्ट भूमिका
कणकवली
चिपी विमानतळावर नोकऱ्या आहेत त्याची माहिती जिल्ह्यातील बेरोजगारांना सत्ताधारी का देत नाहीत.येथील युवक युवतींनाच चिपी विमानतळावरील नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत.एकही बाहेरचा माणूस या नोकर भरतीत असता गामा नये, स्थानिकांच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत.स्थानकांवर अन्य केला जात असेल तर गप्प बसणार नाही.असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.
चिपी विमानतळावर उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या स्थानिकानाच मिळालाय हव्यात.अशी आग्रही भूमिका घेत आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. बाहेरच्या लोकांना नोकरीत सामावून घ्यायला देणार नाही.प्रशिक्षित नोकर वर्ग जो हवा आहे तो प्रशिक्षित करू त्यासाठी आम्ही सर्व सहकार्य करू मात्र नोकऱ्या स्थानिकानाच मिळाल्या पाहिजेत,कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांना रोजगार मिळण्यासाठी नवीन संधी राज्यसरकार देत नसेल तर केंद्र सारकाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रकल्पात तरी स्थानिकानांच संधी मिळाली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
प्रत्यक गोष्टीत राज्यसरकार आमच्यावर अन्याय करत आहे.बियर बार उघडायला वेळ आहे मात्र वॉटर स्पोर्ट ला परवानगी दिली जात नाही.उत्पनाचे सर्वच मार्ग बंद करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने चालविला आहे अशी टीकाही आमदार श्री.राणे यांनी केली.