You are currently viewing ९ एप्रिल रोजी सलग १० व्या वर्षी “संस्कृती कला मंच – फोंडाघाट” आयोजित भव्य शोभायात्रा

९ एप्रिल रोजी सलग १० व्या वर्षी “संस्कृती कला मंच – फोंडाघाट” आयोजित भव्य शोभायात्रा

कणकवली :

 

दरवर्षी फोंडाघाट गावातील गुढीपाडवा आणि त्यानिमित्ताने संस्कृती कला मंच फोंडाघाट यांच्या संयोजनाखाली, आणि स्व. सचिन नारकर यांच्या प्रेरणेने चालू झालेला, मराठी नववर्षाच्या जल्लोषानिमित्त, भव्य शोभायात्रा कणकवली तालुक्याचे प्रमुख आकर्षण असते. नववर्षाच्या जल्लोषा जमुया सारे एकत्र , जयघोष ग्रामदेवतेचा, अन् शुभेच्छा देऊ सर्वत्र— अशा संदेशावर आधारित, सलग १० वर्षी मंगळवार तारीख ९ एप्रिल २४ रोजी सायंकाळी ५ वाजता उगवाई कॉम्प्लेक्स ते मारुती मंदिर या दरम्यान भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेमध्ये सर्व ग्रामस्थांनी पारंपारिक वेशभूषा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या यात्रेमध्ये प्रमुख आकर्षण — राधाकृष्ण महिला ढोल पथक – फोंडाघाट, रंगखांब ग्रुप- कणकवली यांचा नृत्याविष्कार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाजलेले फुगडी नृत्य, महिला पारंपारिक समई नृत्य , वारकरी संप्रदाय दिंडी,खास रामलल्ला विषयावर आकर्षक चित्ररथ, संस्कृती कला मंच- शिवकन्यांकडून शिवकालीन मर्दानी खेळ आणि लेझीम नृत्य सहभागी होणार आहे. तमाम नागरिकांनी,आबाल- वृद्धांनी आणि ग्रामस्थांनी उत्साहात सहभागी होऊन सहकार्य करावे आणि नववर्षाच्या जल्लोषात सहभागी व्हावे, अशी विनंती संस्कृती कलामंच फोंडाघाट व ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा